महाबळेश्वर मध्ये मंगलमय वातावरणात वाजत गाजत गणपती बाप्पाचे आगमन…..
पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुकाध्यक्ष:-9403546485

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुकाध्यक्ष
महाबळेश्वर मध्ये मंगलमय वातावरणात वाजत गाजत गणपती बाप्पाचे आगमन…..
महाबळेश्वर (सातारा)
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या जय घोषात आज आपल्या लाडक्या गणरायाचे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी आगमन झाले. महाबळेश्वर परिसरामध्ये आज सकाळपासून आपल्या लाडक्या गणरायाला घरी आणण्यासाठी गणेश भक्तांची व बालचमूंची वर्दळ पाहायला मिळत होती. मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गणपती बाप्पाच्या आगमनाला हजेरी लावल्याने गणेश भक्तांची तारांबळ उडालेली पाहायला मिळत होती परंतु भर पावसात देखील गणेश भक्तांचा जोशपूर्ण उत्साह दिसत होता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषात कुणी आपल्या हातावर कोणी आपल्या वाहनातून गणेश मूर्ती घरी घेऊन जात होते. ढोल ताशा पथक , बॅड, बॅन्जो च्या तालावर नाचत मंडळाच्या गणेश मूर्तीची मिरवणूक मुख्य बाजारपेठेतून काढली होती. हार फुले फळे तसेच गणरायचे आवडते मोदक, पेढे घेण्यासाठी बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळत होती. भक्तीभावाने आणि मंगलमय वातावरणात वाजत गाजत बप्पाचे स्वागत करून आपल्या घरी गणेशाची स्थापना केली काही मंडळांनी आदल्या दिवशीच गणपतीची मिरवणूक काढली होती मंगलमय वातावरणात गणेशाची स्थापना करण्यात आली