सातारा:-कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक उपक्रम; नागठाणे येथे १०० टक्के मोफत चारा वाटप.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा:-कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक उपक्रम; नागठाणे येथे १०० टक्के मोफत चारा वाटप.

सातारा (प्रतिनिधी): १ जुलै कृषी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन व नागठाणे पशुवैद्यकीय दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुधन संवर्धनासाठी १०० टक्के मोफत चारा वाटप करण्यात आले. नागठाणे पशुवैद्यकीय दवाखान्यात आयोजित या उपक्रमाला शेतकरी व पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
याप्रसंगी नागठाणे पंचायत समिती गणाचे सदस्य श्री. संतोष साळुंखे पाटील, अपशिंगे पंचायत समिती गणाचे सदस्य श्री. मानसिंग मोरे पाटील, कृषीभूषण मनोहर साळुंखे (भाऊ), संघर्ष योद्धा नंदकुमार नलावडे (नाना), वर्धन ॲग्रोचे संचालक श्री. अविनाश साळुंखे, साक्षी उद्योग समूहाचे श्री. नितीन साळुंखे (तात्या), नागठाणे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. मारुती जेधे, व्हाइस चेअरमन श्री. संताजी साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य श्री. दत्तात्रय साळुंखे (तात्या), श्री. हनुमंत साळुंखे (तात्या), श्री. संजय साळुंखे, युवा नेते श्री. अभिजीत साळुंखे, श्री. प्रशांत यादव, संचालक श्री. गोरख यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते पात्र शेतकरी व पशुपालकांना मोफत चाऱ्याचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी कृषी दिनाचे महत्त्व अधोरेखित करत शेतकरी व पशुपालकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. चारा टंचाईच्या काळात शासनाचा हा उपक्रम पशुपालकांसाठी मोठा दिलासा ठरणार असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नागठाणे पशुवैद्यकीय दवाखान्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित शेतकऱ्यांनी शासनाच्या या लोकहितकारी उपक्रमाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले.




