कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारनेर:-५ जुलैला राळेगणसिद्धितुन शिवपाणंद शेतरस्ता जनजागरण यात्रेचा शुभारंभ.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

५ जुलैला राळेगणसिद्धितुन शिवपाणंद शेतरस्ता जनजागरण यात्रेचा शुभारंभ.

पारनेर ,सुपा – राजकुमार इकडे पारनेर तालुक्याची ओळख क्रांतीकारकांचा राष्ट्रभक्तांचा समाजसेवकांचा तालुका म्हणून असुन यासाठी तालुक्याने सामाजिक योगदानातुन राष्ट्रहिताच्या महत्वपूर्ण चळवळी उभारून देशसेवेचा धर्म निभावला आहे त्याच जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित केल असुन त्याच पारनेर तालुक्यात शेतरस्त्यांच्या ज्वलंत प्रश्नावर राळेगणसिद्धी नारायणव्हाण शिवरस्त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी प्रशासकीय न्यायालयीन जनजजागृती आंदोलनाच्या माध्यमातून शेतरस्त्यांसाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी माझा रस्ता होवो न होवो “जोपर्यंत माझ्या शेवटच्या भावाला दर्जेदार शेतरस्ता मिळत नाही तो पर्यंत थांबणार नाही असा संकल्प करून मला जो त्रास झाला तो इतरांना होवू नये म्हणून “शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धीचा नारा देत राज्यभर चळवळ पोहचवली शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचा संघर्ष हा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून, जाणीवपूर्वक शेतरस्ते अडवून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या प्रवृत्तीविरोधात आणि प्रशासकीय यंत्रणेमधील त्रुटींमुळे शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आहे.एक शेतरस्ता बंद होतो तेव्हा फक्त रस्ता बंद होत नाही, तर एका शेतकरी कुटुंबाच्या आशा, स्वप्ने आणि भविष्याचा मार्ग अडवला जातो. अनेकदा अज्ञान, आर्थिक अडचणी, घरची प्रतिकूल परिस्थिती आणि न्याय मिळविण्याच्या मर्यादित साधनांमुळे शेतकरी हतबल होतो. शेतात जाण्याचा मार्ग बंद झाल्यानंतर होणारे आर्थिक नुकसान, वर्षानुवर्षे चालणारा संघर्ष आणि त्यातून मनात निर्माण होणारी असंख्य विचारांची वादळे संपूर्ण कुटुंबाला अस्वस्थ करून टाकतात.
अनेक वेळा ही परिस्थिती इतकी गंभीर बनते की शेतकऱ्यांना जमिनी विकाव्या लागतात, नातेसंबंध तुटतात, वाद-विवाद वाढतात, भांडणे होतात आणि काही दुर्दैवी प्रसंगी हत्या, आत्महत्या यांसारख्या टोकाच्या घटना घडतात. या वेदनादायी चक्रव्यूहातून बाहेर पडणे एका सामान्य शेतकरी कुटुंबासाठी अत्यंत कठीण ठरते.याच वेदनेतून शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचा जन्म झाला. संघर्षासोबतच न्याय देणारे हात निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केला. ॲड. प्रतिक्षा काळे यांनी छत्रपती संभाजीनगर हायकोर्यात प्रभावी बाजू मांडत यशस्वी न्यायालयीन लढा दिला अर्ज केल्यानंतर ६० दिवसांत रस्ता शिव रस्ता निशुल्क हद्द निश्चितीसह खुला करण्याचे न्यायालयाचे आदेश महत्वपूर्ण राहिले सरकारसमोर सातत्याने पाठपुरावा करून नकाशांवरील रस्ते, प्रलंबित शेतरस्ता प्रकरणे आणि शेतकऱ्यांच्या अडचणी प्रभावीपणे मांडल्या. दुसऱ्या बाजूला, राज्यभरातील शेतकरी बांधवांना एकत्र करून त्यांच्या हक्कासाठी संघटित शक्ती उभी केली.आज शिव पाणंद चळवळ ही केवळ एक संघटना नसून हजारो शेतकरी कुटुंबांना आधार देणारे, न्यायाची आशा देणारे आणि संघर्षाला दिशा देणारे व्यासपीठ बनले प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. हा न्याय देण्याचा अधिकार ज्या यंत्रणेकडे आहे, त्यातील अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून शेतकऱ्यांना न्याय दिला. परंतु काही ठिकाणी अन्यायही झाला, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.राज्य सरकारने नकाशावरील रस्त्यांच्या प्रश्नावर सकारात्मक पावले उचलली आहेत. त्यामुळे आगामी काळात अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे. मात्र शेतरस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सातत्यपूर्ण, संयमी आणि सकारात्मक संघर्ष आवश्यक आहे. म्हणूनच आपण “मिशन झिरो पेण्डन्सी” हा नारा दिला आहे.आपली ऊर्जा परस्पर वादात खर्च न करता ती शेवटच्या गरजू शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी वापरली पाहिजे. विविध माध्यमांतून हा ज्वलंत विषय जिवंत ठेवत, सकारात्मकतेने आणि एकजुटीने पुढे जात राहिलो तर नक्कीच यश आपल्या पायाशी असेल त्याचबरोब महत्वपूर्ण शासन राज्यात निघाले परंतु प्रशासकीय कार्यालयांकडून प्रत्यक्ष अंकलबजावनी होत नसल्यामुने रविवारी ५ जुलैला राळेगणसिद्धीतुन राज्यव्यापी शिव पाणंद शेतरस्ता जनजागरण यात्रा शुभारंभ व पदाधिकारी सन्मान अभियान जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते होणार आहे महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले.

चौकट- अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर न्यायालयाच्या आदेशासोबत शासननिर्णयाच्या अंमलबजासाठी शिव पाणंद शेतरस्ता चळवळीने केलेल्या पेरू वाटप आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांनी महत्वपूर्ण शिवरस्ता निशुल्क मोजणीचे परिपत्रक काढून मोठे बळ दिले अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा, श्रीगोंदा,श्रीरामपुर ,संगमनेर, शेवगाव,पाथर्डी,राहाता,राहूरी तालुक्यासह छत्रपती संभाजीनगर, नाशिक,जळगाव,पुणे( ता.शिरूर, जुन्नर, आंबेगाव, दौंड)सातारा, कोल्हापूर,ठाणे आदिंसह विविध जिल्ह्यात तालुक्यान गावागावात फिरून पोहचवली प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला हक्काचा दर्जेदार सिमेंटचा रस्ता मिळून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- शरद पवळे( प्रणेते, महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळ)

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button