अहमदनगर:-फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला नगर मध्ये आग.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला नगर मध्ये आग.
श्रीरामपूर (RPs स्टार न्युज प्रतिनिधी ) नगर शहरातील मनमाड रोडवरील साई मिडास या इमारतीतील वरच्या मजल्यावरील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला आज मंगळवारी सकाळी आग लागली महानगर पालिकेच्या अग्रिशमन बंबाने काही क्षणात ही आग विझवली . याबाबत अधिक माहिती अशी की . शहरातील नगर मनमाड रोड वरील डैले हॉस्पिटल चौकातील साई मिडास या इमारतीमध्ये बँका, पतसंस्था, सोन्या चांदीचे दुकाने दवाखाना तसेच फायनान्स कंपनीची कार्यालये आहेत. या इमारतीच्या सर्वात वरच्या मडल्यावर एका फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या शेजारीच एक डोळ्यांचा दवाखाना ही आहे या कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूने आज सकाळी साडेनऊच्या बाजूने आज सकाळी साडेनऊच्या सुमारास थोडी आग लागल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले मात्र काही क्षणातच ही आग भडकली धूर बाहेर पडू लागला. ही बाब स्थानिकांनी महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाने तत्काळ बंब दाखल झाला आणि पाण्याच्या फवार्याने ही आग विझवण्यात यश आले . यामध्ये कोणत्याही प्रकारची डीवित हानी झाली नाही . मात्र इमारतीवरील काही फनिंचरचा भाग खाली कोसळला होता.