ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-जय होलार सामाजिक संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी हनुमंत खांडेकर यांची नियुक्ती.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

जय होलार सामाजिक संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी हनुमंत खांडेकर यांची नियुक्ती.

सातारा दि:
महाराष्ट्रातील होलार समाजाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे झटणारी संघटना म्हणून जय होलार सामाजिक सेवाभावी संस्था ठाणे यांच्याकडे पाहिले जाते. या संस्थेच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम राबवण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संस्थेचे जाळे विणले असून राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज ,भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वि दा. आयवळे शिवाजी हत्तेकर यांच्या विचारधारेतून उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी होलार सेवाभावी संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी सातारचा ढाण्या वाघ व होलार समाजाचा खंदा समर्थक हनुमंत खांडेकर रा. शनिवार पेठ सातारा यांची निवड करण्यात आली .
त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केलेले आहे. होलार सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार नामदास ,सचिव चंद्रकांत नामदास ,कार्याध्यक्ष धर्मेंद्र नामदास, खजिनदार गणेश नामदास, पत्रकार भारत जगताप यांच्यासह लोहार समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये होलार समाजाच्या न्याय हक्कासाठी हनुमंत खांडेकर झटत आहेत. लवकरच सातारा शहरांमध्ये होलार भवन बांधण्याचे दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या होलार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व होलार बांधवांनी विचार विनिमय करावा. असे आवाहन हनुमंत खांडेकर यांनी केले आहे.

—————————————–
फोटो -पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख होणार समाजाचे नेते खांडेकर

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button