क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निगडी:-मंदिरातून दर्शन करून येत असताना तरूणीवर ब्लेडने वार आणि विनयभंग.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे :-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

मंदिरातून दर्शन करून येत असताना
तरूणीवर ब्लेडने वार आणि विनयभंग.

निगडी, दि. 24 (शफिक शेख) – बेल्हेश्वर मंदिर येथून दर्शन करून येत असताना भरदिवसा चार आरोपींद्वारे 25 वर्षीय तरूणीवर ब्लेडने वार करणे आणि तिचे कपडे फाडून विनयभंग केल्याच्या प्रकरणाने निगडी परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत तरूणीच्या बहिणीने निगडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 22 रोजी फिर्यादी महिलेची 25 वर्षीय बहीण सकाळी 11.30 च्या सुमारास गंगानगर येथील बेल्हेश्वर मंदिरातून दर्शन करून येत असताना गुरूदेवनगर येथील रस्त्यावरील कणीस विक्रेत्याकडे कणीस घेण्यासाठी थांबली असता आरोपीत चेतन मारूती घाडगे याच्या सांगण्यावरून त्याच्या तीन साथीदारांनी तरूणीच्या पाठीमागून मोटारसायकलवर आले आणि त्यांच्यापैकी एकाने ‘काढ रे काढ कोयता आणि हिचेवर वार कर’ असे सांगितले. ते ऐकताच घाबरून तरूणीने तेथून पळ काढला आणि पळत जावून पांढरकर सभागृहाच्या मागे गुरूदेवनगर येथील शौचालयात लपली ते तीनही आरोपी तिच्या मागे शौचालयात गेले आणि तेथे त्यांनी तिच्या अंगावरील तिचे सर्व कपडे फाडले आणि तिच्या अंगावर आणि प्रायव्हेट पार्टवर दारू ओतून तिला मिर्ची खाउ घातली. तसेच तिच्या हातावर ब्लेडने वार केले. तिने आरडाओरड सुरू केल्याने लाक जमू लागल्याचे पाहताच तिघांनी तेथून पळ काढला.
याबाबत तरूणीची मोठी बहीणी हिने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असता निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. ओमासे यांनी प्रकरणाचे गांभिर्य ओळखून वेळ न दवडता ताबडतोब भादवि कलम 354, 354 (ड), 324, 506, 120 (ब) या कलमानुसार गुन्हा दाखल करून कारवाईस सुरूवात करीत त्या आरोपींपैकी मुख्य आरोपी चेतन मारूती घाडगे यास अटक केली. इतर तीन आरोपींच्या तपास सुरू आहे. तरी रात्री उशिरापर्यंत उर्वरित आरोपींचा तपास सुरूच होत असल्याचे श्री. ओमासे यांच्याकडून सांगण्यात आले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button