कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-खंडाळा तहसिल कार्यालय सेतू विभाग व निविदा ठेकेदार यांच्या भ्रष्टचाराबाबत मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी दिले कारवाई चे आदेश.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

खंडाळा तहसिल कार्यालय सेतू विभाग व निविदा ठेकेदार यांच्या भ्रष्टचाराबाबत मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी दिले कारवाई चे आदेश.

दरे- महाबळेश्वर – दिनांक 25/01/2024 रोजी मौजे दरे येथे माहिती अधिकार जनजागृती अभियान केंद्राचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. सुनीलकुमार बावधनकर यांनी मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांना समक्ष भेटून त्या ठिकाणी खंडाळा तहसिल कार्यालयात होणाऱ्या अधिकाऱ्यांचा तसेच नागरी सुविधा केंद्र सेतू मधील ऑपरेटर यांच्या भ्रष्टाचाराबाबत समक्ष भेटून व निवेदन देऊन दोषींना तत्काळ निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. यापूर्वी दि. 08/01/2024 रोजी उपविभागीय अधिकारी वाई यांच्याकडे या प्रकरणाबाबत सुनावणी झाली होती तसेच जिल्हाधिकारी साहेब सातारा यांना समक्ष भेटून खंडाळा सेतू मधील भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले होते. परंतु जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व खंडाळा तहसिलदार यांनी दोषींवर अद्याप कोणतीही कारवाही केलेली दिसून आली नाही.

या सर्व गोष्टी नंतर महिती अधिकार जनजागृती अभियान केंद्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. सुनीलकुमार बावधनकर यांनी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन समक्ष निवेदन पुराव्यांसह सादर केले.

खंडाळा तहसिल कार्यालयात सेतू विभागामध्ये मुकेश सपकाळ, आदिनाथ देवकाते व इतर खाजगी ऑपरेटर यांच्यावर वारंवार तक्रारी झाल्या होत्या व त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नव्हती.

परंतु मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सदर दोषींवर तसेच निविदा घेतलेली कंपनीचे ठेकेदार यांच्यावर तत्काळ कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकारी सातारा यांना दिले आहेत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button