फलटण:-रासपच्या महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षपदी निकिता सुळ यांची निवड.
प्रतिनिधी समीरखान पठाण फलटण:-9766685375

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
फलटण प्रतिनिधी : समीर पठाण
राष्ट्रीय समाज पक्षा फलटण तालुक्यातील , तरडगाव येते रा स प फलटण तालुका महिला आघाडी अध्यक्ष सौ. निशा विक्रम माने यांच्या हस्ते फलटण तालुका उपाध्यक्षपदी ह.भ.प.कीर्तनकार कु. निकीता बाळासो सुळ यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच रावडी खुर्द गावचे युवा नेते सागर भाऊ गायकवाड यांनी राष्ट्रीय समाज पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी रा. स. प. चे सातारा जिल्हा युवा नेते संतोष ठोंबरे, फलटण तालुका उपाध्यक्ष महादेव कुलाळ , तरडगाव जिल्हा परिषद गट प्रमुख नितीन सुळ, पाडेगाव गण प्रमुख वैभव नरुटे, तरडगाव गण प्रमुख दादा केसकर, मोर्य क्रांती संघाचे जिल्हाध्यक्ष कालिदास चोरमले, सौ. शीतल महादेव कुलाळ यांची उपस्थिती होती.
यावेळी फलटण तालुकाध्यक्ष सौ. निशाताई माने यांनी बोलताना शासकीय योजनांची माहिती दिली तसेच राष्ट्रीय समाज पक्षात नव तरुणांनी काम करून आपल्या गावचे नाव उज्वल करावं असे त्यांच्या भाषणात सांगितले सातारा जिल्हा फलटण तालुका राष्ट्रीय समाज पक्ष तालुका उपाध्यक्ष महादेव कुलाळ यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची विचारधारा समजावून सांगितली तसेच येणाऱ्या काळात तरडगाव जिल्हा परिषद गटामध्ये जास्तीत जास्त संख्येने तरुण वर्ग राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करनार आहेत. त्यांना संबंधित करताना महिला वर्ग या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले तसेच येणाऱ्या काळात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक निवडणुकीला सामोरे जाणार आहे.
यावेळी सौ. उज्वला मारूती शेंडगे, सौ. संध्या हनुमंत कुलाळ, सौ लता तनाजी कुलाळ, सौ. संगीता बापुराव कुलाळ, सौ. ऋषाली आधीनाथ कुलाळ, मालन सर्जेराव कुलाळ , दादा डोंबाळे , बाळासो सुळ, संजय कुलाळ, मयूर कुलाळ, बिराजी कुलाळ, संपत कुलाळ , रणजीत कुलाळ , गणेश कुलाळ , तात्याबा कुलाळ , बीराजी कुलाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.