सातारा:-साहित्य संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील थापाडे साहित्यिक- सुरेश पाटील
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
साहित्य संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील थापाडे साहित्यिक- सुरेश पाटील

सातारा दि: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नूतन अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील यांची साताऱ्यातील मराठी साहित्य संमेलनाला निवड झाली. त्यानिमित्त सत्कार सोहळा संपन्न झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी श्री पाटील यांचे बंधू साहित्यिक सुरेश पाटील यांची पत्रकार परिषद झाली. यामध्ये विश्वास पाटील साहित्यक नव्हे तर थापाडे आहेत. अशा शाब्दिक झाडाझडती त्यांचे बंधू साहित्य सुरेश पाटील यांनी केल्याने खळबळ माजली आहे.
सातारा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक श्री. विश्वास पाटील यांची निवड झाल्यानंतर प्रथमच साताऱ्यात त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात पानिपत कार श्री विश्वास पाटील यांचे धाकटे बंधू व साहित्यिक सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ पत्रकार शिवाजी राऊत, चंद्रकांत खंडाईत, गणेश कारंडे, वामन गंगावणे व मानसिंग यादव आधी सहकारी उपस्थित होते.
श्री विश्वास पाटील यांची झाडाझडती ही कादंबरी बोगस असून ते माझे बंधू असले तरी माणसं मारण्याची त्यांची स्टाईल आहे. मराठा आरक्षणासाठी ५९ मोर्चे निघाले त्यावेळी ते सामील झाले नाहीत. परंतु हैदराबाद गॅझेट बाबत जरांगे पाटील यांनी जमीन मऊ केल्यानंतर तिथे नांगर चालवायला हे निघाले आहेत. आपल्या कादंबऱ्या विकल्या जाण्यासाठी ते स्वार्थी इथून पुढे आलेले आहेत त्यामुळे ते व्यक्तिगत टीकाटिपणी करत असून आमच्यात कोणतेही भांडण नाही.
आजही जमीन व घरी एकत्र असून आम्ही फक्त मुंबईत दोन्ही ठिकाणी राहत आहे. पुरंदरे प्रकरण गाजले असताना त्यांनी भूमिका घेतली नाही. राजमाता चारित्र्यावर घाव घालणाऱ्या साहित्यिकाला जोड्याने मारली पाहिजे. असे असतानाही क्रीम पोस्टिंग साठी त्यांनी गप्प राहण्याची भूमिका घेतली.
साहित्यिक विश्वास पाटील यांनी काँग्रेसची नाळ घोटून झाल्यानंतर २०१५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख यांना पानिपत पुस्तक भेट देण्याची विनंती भाजप उपाध्यक्ष डॉ. शेजवळ यांच्यामार्फत केली होती. लोकसत्ता वृत्तपत्रांनी त्यांच्यावर टीकाटिपणी केल्यानंतर साहित्यिक विश्वास पाटील यांनी लोकसत्ता विरोधात न्यायालयात दावा दाखल केला. परंतु, कधीही तारखेला हजर झाले नाहीत. असा ही आरोप श्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
पडवळचे फुल दोडक्याला…. काजळ कुंकू बोडकिला… अशा शेलक्या शब्दात बंधू व साहित्यिक सुरेश पाटील यांनी टीकाटिपणी करताना काही संदर्भ दिले. यामध्ये साहित्यिक विश्वास पाटील यांच्या बद्दल अनेक गंभीर आरोप करून साहित्य क्षेत्रात प्रचंड खळबळ निर्माण केली आहे. हा वाद मिटण्याऐवजी वाढतच गेला असून याबाबत आता तरुण साहित्यिकांना सत्य बाजू कुणीतरी धाडसने सांगावे. अशी प्रतिक्रिया उमटत आहे.




