वाई:- सत्तेत येताच सिस्टीम हलली! भगवा कट्ट्यात विकासाचा थेट भूकंप.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई:- सत्तेत येताच सिस्टीम हलली! भगवा कट्ट्यात विकासाचा थेट भूकंप.

वाई (प्रतिनिधी):
सत्ता म्हणजे खुर्ची नव्हे, सत्ता म्हणजे काम! नगराध्यक्ष अनिल सावंत आणि प्रभाग क्रमांक ७ च्या तरुण, निर्भीड व तडफदार नगरसेविका केतकी पाटणे यांनी पदभार स्वीकारताच प्रशासनाला हालचालीत आणले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रभाग सातमधील भगवा कट्टा परिसरातील बंदिस्त गटर कामाचा आज प्रत्यक्ष मैदानात उतरून श्रीफळ वाढवत विकासाचा श्रीगणेशा करण्यात आला.
घोषणांची धूळ झटकून, फाईल संस्कृतीला छेद देत नव्या नेतृत्वाने कामातूनच आपली दिशा स्पष्ट केली. या वेळी बोलताना नगरसेविका सौ. केतकी पाटणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पुढील पाच वर्षे प्रभाग सातमध्ये रस्ते डांबरीकरण, बंदिस्त गटारे, स्वच्छता व मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देऊन हा प्रभाग नागरिकांच्या तक्रारींपासून मुक्त केला जाईल.” विकासाचा अजेंडा आता बोलण्यात नाही, तर प्रत्यक्ष कृतीत उतरल्याचा ठाम संदेश त्यांनी दिला.
या शुभारंभ सोहळ्याला नगराध्यक्ष, भाजपा अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवप्रकाश मंडळाचे अध्यक्ष दिलीप शिवदे, वझे काका, काशिनाथ शेलार, अनिल गोळे, नरहरी महाबळेश्वर गुरुजी, अमर सुतार, आशिष पाटणे, गंगाराम सकुंडे, मधुकर सकुंडे, अमित देशमाने, अॅड. सायली सकुंडे, सुदर्शन चव्हाण, अनिकेत चव्हाण, संतोष पोफळे, वेदमूर्ती महाबळेश्वरकर गुरुजी, सुनील गोळे, प्रशांत चिटणीस, रमेश बेलोशे, दिलीप बेलोशे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी नव्या नेतृत्वाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी नगराध्यक्ष अनिल सावंत, शहराध्यक्ष विजय ढेकाणे, कुलदीप शिंदे व पाटणे कुटुंबीय यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.
घोषणा संपल्या, अॅक्शन सुरू! वाई शहराच्या विकासाला लागला खरा वेग.




