ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-मोटरसायकलच्या धडकेने वृद्ध महिला ठार तर घटने नंतर एका अधिकाऱ्याच्या उर्मटपणाचे दर्शन.

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

पत्रकार अजित जगताप सातारा

मोटरसायकलच्या धडकेने वृद्ध महिला ठार तर घटने नंतर एका अधिकाऱ्याच्या उर्मटपणाचे दर्शन.
वडूज दि: खटाव तालुक्यातील मानेवाडी पोस्ट पळसगाव येथील ८० वर्षाच्या वृद्ध महिला शहाबाई उत्तम माने या डांबरी रस्त्यावरून चालत घरी जाताना भरधाव वेगाने आलेल्या एका मोटरसायकल ने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी वडूज ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले असता त्या मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
सदर घटनेनंतर त्या ठिकाणी आलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने उर्मट भाषा व महिलांना मारहाण केल्याची तक्रार वडूज पोलीस ठाण्यात देण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू होती. अधिकाऱ्यांचे वागणे अशोभनीय झाल्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. असे समजले.
याबाबत माहिती अशी की, सोमवार दिनांक १५ मे रोजी दुपारी सव्वातीन वाजता श्रीमती शहाबाई उत्तम माने वय ८० या रस्त्याच्या एका बाजूने आपल्या घरी जात असतानाच पडळ ते कातर खटाव रस्त्यावरील पडळ बाजू कडून मोटरसायकल क्रमांक एम एच ११ सीपी ४०६५ या मोटरसायकलने श्रीमती माने यांना जोरदार धडक दिल्यामुळे त्या रस्त्यावरच पडल्या. यामध्ये त्यांच्या हाताला डोक्याला गंभीर दुखापत झाली. सदरची घटना घडतातच श्रीमती माने यांचे नातेवाईकांनी त्यांना तातडीने स्वतः च्या चार चाकी वाहनातून तातडीने वडूज येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले परंतु, त्यांची तपासणी केली असता उपचारापूर्वीच मृत्यू पावल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
सदरची घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या तहसीलदार दर्जाच्या एका अधिकाऱ्यांनी माणुसकी दाखवण्याऐवजी उर्मट भाषा वापरून माने यांच्या कुटुंबातील नातेवाईकांना दमदाटी करून तुम्ही जागीरदार असा, तुम्हाला दाखवतो अशी दमबाजी केल्याची माहिती देण्यात आली.
सदरच्या घटनेमुळे दुःखी झालेल्या माने कुटुंबीयांनी सदरच्या अधिकाऱ्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात मानहानी व मारहाण करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली. अपघात हा अपघात असतो अशा वेळेला जखमी व्यक्तीला माणुसकी म्हणून तातडीने वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाणे. ही प्रथम जबाबदारी असते. ही जबाबदारी टाळून घटनास्थळा पासून पळून जाणे. त्यानंतर जबाबदार अधिकाऱ्यांनी जखमीच्या नातेवाईकांना अरेरावीची भाषा करणे योग्य नाही .अशा प्रकारामुळे व्यतीत झालेल्या माने कुटुंबियातील महिलांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकाराची संपूर्ण खटाव तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. सदरची व्यक्ती ही वरिष्ठ अधिकारी असून विना नंबर असलेल्या एका चार चाकी वाहनातून ते घटनास्थळी आले होते. यावेळी त्यांचा रुद्र अवतार पाहून अनेक जण घाबरलेली दिसत होते. याबाबत रात्री उशिरा वडूज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे काम सुरू होते. दरम्यान संबंधित तहसीलदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. सदर घटना घडल्यामुळे वडूज ग्रामीण रुग्णालयात अनेक मान्यवरांनी गर्दी केली होती. यावेळी आप्पासाहेब गोडसे, संदीप गोडसे, किसन आबा गोडसे व वडूज येथील शिवाजी नगर परिसरातील नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_______________________________________
फोटो – श्रीमती माने यांचा फोटो

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button