राहता:-नांदूर्खी बु.ग्रामपंचायतचे प्रहारचे सरपंच पदाचे उमेदवार श्री.वसंत अर्जुन काळे.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9022552792

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
राहता:- 10/12/2022 -नांदूर्खी बु.ग्रामपंचायतचे प्रहारचे सरपंच पदाचे उमेदवार श्री.वसंत अर्जुन काळे यांच्या नारळ फोडायचा आज कार्यक्रम पार पडला.या प्रसंगी प्रहारचे सर्व पदाधिकारी,व मोठ्या प्रमाणात मित्रमंडळ व मोठ्या प्रमाणावर गावकरी उपस्थित होते.
माझ्या आयुष्यात साई बाबांनी काय चांगला योग आणला बघा.माझं प्रचाराच नारळ फोडन्याचा आज कार्यक्रम आहे.आणि आज मला रक्तदान करून माझ्या प्रचाराचा शुभारंभ करण्याचा योग जुळून आला.मुंबई येथिल वाशीमचे भक्त याचे पेशंट साईबाबा हॉस्पिटल येथे ऍडमिट आहे.व त्यांना रक्ताची आवश्यकता होती व मला फोन आला आणि मी लगेच आज सकाळी साडेनऊ वाजता साईनाथ रक्तपेढी येथे जाऊन रक्तदान करून आलो.मी आज माझ्या महत्वाच्या दिवशी कोणाच्या तरी काही कामी आलो व हे काम करून मी माझी पुढील वाटचाल करत आहे याचा मला अभिमान आहे.. अशी प्रतिक्रिया वसंत काळे यांनी व्यक्त केली.
.