सातारच्या मानसी मोहितेचा गिनीज बुकमध्ये विश्वविक्रम! पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सन्मान.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सातारच्या मानसी मोहितेचा गिनीज बुकमध्ये विश्वविक्रम! पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सन्मान.

सातारा : जिद्द, मेहनत आणि अथक परिश्रमांच्या जोरावर नागठाणे गावची सुकन्या कु.मानसी मिनाक्षी महेश मोहिते* हिने क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. हैदराबाद येथे २६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित भव्य कराटे प्रात्यक्षिकात सहभागी होत तिने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये* आपल्या नावाची नोंद केली. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शंभूराज देसाई साहेब यांच्या हस्ते शाल, मेडल व प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मानसीच्या यशाचे कौतुक करत तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले व भविष्यातही क्रीडा क्षेत्रात अशीच उज्ज्वल कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पाटण विभागातीलश्री. विवेक भिसे, श्री रवी साळुंखे यांनी मानसीला शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने आपल्या जिद्दीच्या आणि क्रीडा कौशल्याच्या बळावर थेट जागतिक स्तरावर झेप घेतल्याने नागठाणे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मानसीच्या या यशामुळे तिचे कुटुंबीय, मार्गदर्शक, प्रशिक्षक आणि ग्रामस्थांची मान अभिमानाने उंचावली असून संपूर्ण परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नागठाणेच्या लेकीची जागतिक भरारी; मानसी मोहितेच्या यशाने सातारा जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला!
2) मल्हार पेठ:- रायगडाच्या प्रतिकृतीतून शिवशाहीचा इतिहास जिवंत! पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक

मल्हारपेठ/दौलतनगर : दिवाळीनिमित्त मल्हारपेठ येथे साकारण्यात आलेल्या ‘राजधानी स्वराज्याची रायगड’ या रायगड किल्ल्याच्या भव्य प्रतिकृतीची राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाहणी केली.
शुभम गणपतराव चव्हाण व समर्थ गणेश मंडळ, दिडुकळीवाडी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या देखण्या प्रतिकृतीचे त्यांनी विशेष कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा मंडळाचा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.




