क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई:-पाचवडमध्ये रात्री चार दुकाने फोडली; सुमारे ५० हजारांची चोरी.
पत्रकार अनिल वाडकर सातारा जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पाचवडमध्ये रात्री चार दुकाने फोडली; सुमारे ५० हजारांची चोरी.

पाचवड (ता. वाई) येथे काल दिनांक २८ रोजी रात्री चोरीची घटना घडली असून पाचवड स्टँड समोर, मुख्य बाजारपेठेतील वृंदावन पॅलेस या इमारतीत असलेल्या चार दुकानांचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व साहित्य असा सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
ही चोरी रात्री १.३० ते पहाटे ४.३० या सुमारे तीन तासांच्या कालावधीत झाली. विशेष म्हणजे संपूर्ण परिसरात CCTV कॅमेरे कार्यरत असतानाही ही घटना घडल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरट्याने तोंडाला मास्क लावला असला तरी CCTV फुटेज बऱ्यापैकी स्पष्ट असून त्याच्या आधारे पोलिस तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित दुकानदारांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.




