नागठाणे:-श्री सिद्धनाथ-जोगेश्वरी यात्रेसाठी ज्यादा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्याची मागणी; नंदकुमार नलवडे व संतोष साळुंखे-पाटील यांचा पुढाकार!
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

नागठाणे:-श्री सिद्धनाथ-जोगेश्वरी यात्रेसाठी ज्यादा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्याची मागणी; नंदकुमार नलवडे व संतोष साळुंखे-पाटील यांचा पुढाकार!

नागठाणे : पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धनाथ-जोगेश्वरी देवस्थान, म्हसवड येथील यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन ज्यादा एसटी बसेस सोडण्यात याव्यात, अशी मागणी नागठाणे गावचे संघर्ष योद्धा युवा नेते श्री. नंदकुमार नलवडे (नाना) व सातारा पंचायत समितीचे विद्यमान सदस्य श्री. संतोष साळुंखे-पाटील यांनी केली.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा आगारप्रमुख सौ. गायकवाड मॅडम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले. यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, गर्दीच्या काळात पुरेशा बस फेऱ्या उपलब्ध व्हाव्यात आणि भाविकांना सुरक्षित व आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी ज्यादा एसटी गाड्यांचे नियोजन करण्याची विनंती करण्यात आली.
भाविकांची सेवा हीच खरी सामाजिक बांधिलकी! या भावनेतून नंदकुमार नलवडे (नाना) व संतोष साळुंखे-पाटील यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे भाविक व नागरिकांकडून स्वागत होत आहे.
यावेळी नागठाणे गावचे विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन श्री.गोरखनाथ यादव,समीर साळुंखे उपस्थित होते.




