आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोरेगाव वांगीत जपला आजीच्या प्रेमाचा जिव्हाळा…

पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

गोरेगाव वांगीत जपला आजीच्या प्रेमाचा जिव्हाळा…

गोरेगाव वांगी ता.खटाव जि.सातारा येथील श्री मयुरेश मदनराव शिंदे व श्री विक्रमसिंह अशोकराव शिंदे या दोन भावांनी आपल्या आजी श्रीमती सुभद्रा रामचंद्र शिंदे (आक्का) यांच्या तृतीय पुण्यस्मरणाराचा सोहळा दिनांक २२ नोव्हेंबर रोजी आयोजित केला होता . ज्या काळात लोक आई वडिलांना विसरुन जातायत त्याच काळात आपल्या आजीचा पुण्यस्मरण सोहळा व्हावा यासारखी भाग्याची गोष्ट नाही. जन्म आणि मृत्यू एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि जेव्हा वेळ येणार तेव्हा ते होणाराच आहे फक्त आपल्याला भगवंताच्या नामस्मरणानात ते जगता आले पाहिजे असे आपल्या मधुर किर्तनातुन ह भ प घनश्याम महाराज लावंड खातगुण यांनी सांगितले. एका सामान्य कुटुंबातील प्राथमिक शिक्षक कै रामचंद्र निळु शिंदे गुरुजी यांच्या पत्नी श्रीमती सुभद्रा रामचंद्र शिंदे आक्का यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत जिवण जगत आपल्या दोन मुली व दोन मुलांचा सांभाळ केला पण काळाच्या ओघात पहिल्यांदा कुटुंबाचा आधार असलेला धाकट्या मुलाचे निधन हा खुप मोठा धक्का बसला आणि नंतर पती व त्या पाठोपाठ थोरला मुलगा असे एका पाठोपाठ एक आघात झाले परंतु तरी त्यांनी न खचता कुटुंबाचा आधार खचु दिला नाही त्यांच्या पश्चात त्यांचे नातु विक्रमसिंह व मयुर यांनी या कुटुंबाची धुरा सांभाळली आहे या कुटुंबाचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे असे मत सातारा सांगली विधान परिषदेचे आमदार मा श्री धैर्यशील कदम यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहत व्यक्त केले. या कार्यक्रमात आपण देवळात जातो देवाला नमस्कार करतो पण त्या देवाच्या पुजारी व्यक्तींना समाजात कधीच सन्मान मिळत नाही हिच गोष्ट लक्षात घेऊन श्री विक्रमसिंह शिंदे व श्री मयुरेश शिंदे यांनी गोरेगाव वांगीतील काही पुजारी व ३३ कोटी देवांचे स्वरुप मानल्या जाणाऱ्या गायीच्या गोपालकांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मुर्ती व चौरंग असा श्रीमती सुभद्रा रामचंद्र शिंदे आक्का यांच्या स्मरणार्थ स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित केलं. या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे आभार शिंदे परिवारातर्फे आभार मानण्यात आले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button