आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारनेर तालुक्यात ACLS व RPS STAR NEWS चा पत्रकार संघटनात्मक विस्तार; चार पत्रकार प्रतिनिधींना नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान!

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पारनेर तालुक्यात ACLS व RPS STAR NEWS चा पत्रकार संघटनात्मक विस्तार; चार पत्रकार प्रतिनिधींना नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान!

समाजातील ज्वलंत प्रश्न शासनदरबारी मांडून न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहणार – राजकुमार इकडे यांची ग्वाही.

पारनेर | प्रतिनिधी

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS STAR NEWS यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात पत्रकार संघटनेचा विस्तार करण्यात आला असून, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व अधिकृत ओळखपत्र प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये राजेंद्र भिकाजी चितळकर यांची पारनेर तालुका अध्यक्षपदी, मनीषा मिठू येणारे यांची पारनेर तालुका महिला अध्यक्षपदी, कविता रमाकांत बडेकर यांची पारनेर तालुका महिला उपाध्यक्षपदी, तर संजय किसन साबळे यांची पारनेर तालुका सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
या सर्व नवनियुक्त पत्रकार प्रतिनिधींना ACLS व RPS STAR NEWS चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय श्री. राजकुमार इकडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी माननीय श्री. राजकुमार इकडे यांनी समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अन्याय-अत्याचार, प्रशासकीय अडचणी तसेच समाजातील ज्वलंत प्रश्नांना पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडून ते प्रश्न शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही राष्ट्रीय अध्यक्ष तथा संपादक माननीय श्री. प्रल्हाद चव्हाण यांना दिली.

पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसून समाजातील वंचित, पीडित आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटनेची ध्येयधोरणे जपत निर्भीड, निःपक्षपाती व सामाजिक बांधिलकीची पत्रकारिता करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS STAR NEWS परिवाराच्या वतीने सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील सामाजिक व पत्रकारितेच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

पत्रकारांच्या एकजुटीतून समाजहिताचा आवाज अधिक बुलंद करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button