श्रीरामपूर:-हरेगाव येथे मतमाऊली यात्रोत्सत्वा निमित्त दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
हरेगाव येथे मतमाऊली यात्रोत्सत्वा निमित्त दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी.

श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) तालुक्यातील हरेगाव येथे संत तेरेजा चर्च मत माऊली भक्तिस्थान हरेगाव येथे ७७ व्या यात्रा महोत्सवास धर्मगुरू फादर डॉमनिक रोझारिओ फादर फ्रान्सिस ओडोळ . फादर संतान रॉट्रीगज आदींच्या हस्ते विधिवत नोव्हेना होऊन व मतमाऊलींच्या शिरावर मुकुट चढवून दर्शन रांगेला प्रारंभ झाला यावेळी लाखो भाविकांची उपस्थिती होती यात्रेची सांगता रविवारी होणार आहे दि . 3 सफ्टेंबर रोजी नासिक प्रांताचे प्रमुख धर्मगुरू ध्वजारोहणाने यात्रेचा शुभारंभ झाला महोत्सवास तहसीलदार मिलिंद कुमार वाघ आमदार हेमंत ओगले . माजी आ भानुदास मुरकुटे माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक . माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे . सचिन गुजर . ज्ञानेश्वर मुरकुटे . बाबासाहेब दिघे .विरेश गलांडे . राजेंद्र पाऊलबुद्धे . माजी सरपंच सुभाष बोधक . सुभाष पांडित .संजय साळवे . आदी उपस्थित होते यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे . पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब शिंदे . सुधीर हापसे . आदी सहकारी बंदोबस्तात होते १४ सहायक पोलिस निरीक्षक व १४०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शनिवारी सकाळ पासूनच हरेगाव फाटा ते चर्च पर्यंत भाविकांची राघ लागली होती . रस्त्याने रविवार दि . १४ सष्टेंबर रोजी यात्रेची सांगता होणार आहे रविवारी सकाळी साडेसात वाजता फादर ज्यो गायकवाड यांचे प्रवचन होईल त्यानंतर संत तेरेज क्लबच्या वतीने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होणार आहे.




