आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवी मुंबई:-डिजीटल युगात आपले व्यवसाय डिजिटल होणे काळाची गरज- आ. गणेश नाईक.

पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

डिजीटल युगात आपले व्यवसाय डिजिटल होणे काळाची गरज- आ. गणेश नाईक.

 

नवी मुंबई – सध्याचे युग हे डिजिटल युग असून, आपले सर्व प्रकारचे
व्यवसाय डिजिटल होणे ही काळाची गरज बनली आहे आणि म्हणूनच मला असा विश्वास आहे कि, कोपरखैरणे परिसरात मुख्य ठिकाणी लावण्यात आलेली ही नवीन एलईडी होर्डिंग डिस्प्ले सेवा नक्कीच जाहिरातीसाठी एक उत्कृष्ट आणि प्रभावी माध्यम बनेल असे प्रतिपादन आमदार गणेश नाईक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. या सेवेचा
आणखीन एक फायदा म्हणजे यामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार होणार नाही,तर यासाठी लागणारा विजेचा देखील वापर हा कमी प्रमाणात होईल असे नाईक यांनी बोलताना सांगितले
कोपरखैरणे रेल्वे स्टेशन जवळ
Apricus मिडिया एलएलपी व सोल्यूशन्स मिडिया सोल्यूशन कंपनीच्या माध्यमातून जाहिरात युगात एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. होर्डिंगसाठी वापरण्यात येत असलेल्या अत्याधुनिक एलईडी डिस्प्लेचे उद्घाटन ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले.त्यावेळी आमदार गणेश नाईक उदघाटन म्हणुन बोलत होते.
या प्रसंगी होर्डिंग लावलेल्या जागेचे मालक रमेश गायकवाड , Desocial मीडिया सोल्यूशन्स कंपनीचे भागीदार
मुरली मट्टूमल, अनुज झा व जीशा मुरली आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी नवी मुंबई पनवेल होर्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष अजित कांडर , समाजसेवक ऍड अंशुवर्धन आदी उपस्थित होते

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button