खंडाळा:-पांडुरंग एज्युकेशनल फाउंडेशन संचलित लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल पळशी तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष
RPS STAR NEWS
पांडुरंग एज्युकेशनल फाउंडेशन संचलित लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल पळशी तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.
खंडाळा- पांडुरंग एज्युकेशनल फाउंडेशन संचलित लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल पळशी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरा केली गेली. याचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया हेमंत भरगुडे यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हेमंत शांताराम भरगुडे सर होते. यानिमित्ताने विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ज्ञानज्योती सावित्रीबाईंच्या आठवणींना वेगवेगळ्या भाषणांमधून उजाळा दिला. लिटिल एंजल्स च्या सर्वच विद्यार्थ्यांनी खूप सुंदर प्रकारे भाषणे सादर केली. त्यानंतर सर्वच शिक्षकांनी नायगाव येथील सावित्री माईंच्या जन्मस्थानी भेट दिली. यावेळी शाळेतील शिक्षिका सायली गायकवाड मॅडम, करिष्मा शेख मॅडम, रोहिणी पानसरे मॅडम, पल्लवी बांदल मॅडम, प्रिया राऊत मॅडम यांचे सहकार्य लाभले.