मुंबई:-महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती; विविध सवलती जाहीर.
पत्रकार अतुल भापकर नगर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मुंबई:-महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती; विविध सवलती जाहीर.

अहिल्यानगर जिल्ह्यातील १४ तालुक्यांचा समावेश; नगर, पारनेरसह

मुंबई, दि. २५ सप्टेंबर २०२६ : खरीप हंगामातील पावसाचा तुटवडा आणि पावसातील दीर्घ खंडामुळे महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळाची पहिली कळ (Trigger-1) लागू केली आहे. यामुळे संबंधित तालुक्यांमध्ये विविध दुष्काळी उपाययोजना राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहाता या १४ तालुक्यांचा समावेश आहे.
दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, मनरेगा कामांमध्ये वाढ, तसेच पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था अशा उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत.
दरम्यान, खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यानुसार स्वतंत्र मदत जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे पीक नुकसानभरपाईबाबतच्या पुढील शासन निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे




