नवी मुंबई:-खारघरमध्ये रविवारी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

नवी मुंबई:-खारघरमध्ये रविवारी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम.

नवी मुंबई :
मराठवाडा मित्र परिवार, नवी मुंबईच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ए. सी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात, सेक्टर ४, खारघर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला लेखक, दिग्दर्शक व गीतकार अरविंद जगताप प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. मराठवाड्याचा इतिहास, मुक्तीसंग्रामाची प्रेरणा आणि मराठवाड्याशी असलेले नाते याविषयी ते उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.
मराठवाड्यातून नोकरी, व्यवसाय तसेच विविध कारणांसाठी नवी मुंबईत स्थलांतरित होऊन वास्तव्यास असलेल्या नागरिकांना एकत्र आणण्यासाठी मराठवाडा मित्र परिवार, नवी मुंबई ही संस्था गेल्या १४ वर्षांपासून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असते
मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई परिसरात वास्तव्यास असलेल्या मराठवाडावासीयांना एकत्र येण्याची, जुन्या-नव्या सदस्यांचा परिचय करून घेण्याची तसेच मराठवाड्याशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे.
कार्यक्रमास मराठवाड्यातील तसेच नवी मुंबई परिसरातील नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठवाडा मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.




