मावळ:-आर. पी. आय. पवन मावळ विभागाच्या युवक अध्यक्ष पदी ठाकुरसाई ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य श्री. अरविंद नारायण रोकडे यांची बिनविरोध निवड.
प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकूर मावळ:-9960044802

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
आर. पी. आय. पवन मावळ विभागाच्या युवक अध्यक्ष पदी ठाकुरसाई ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य श्री. अरविंद नारायण रोकडे यांची बिनविरोध निवड.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) यांची दि. 11/09/2022 रोजी लोणावळा येथील वलवण व्हिलेज रिसॉर्ट येथे संपन्न झालेल्या मेळाव्यामध्ये मावळ तालुक्यातील आर. पी. आय. पवन मावळ विभागाच्या युवक अध्यक्ष पदी ठाकुरसाई ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य श्री. अरविंद नारायण रोकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर सभेस केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री मा. नामदार श्री. रामदासजी आठवले साहेब उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरावदे, महाराष्ट्र युवक अध्यक्ष पप्पू कागदे, नवनिर्वाचित पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांतजी वाघमारे साहेब, मावळ ता. अध्यक्ष लक्ष्मणजी भालेराव साहेब, पु.जि.युवक अध्यक्ष समीर आण्णा जाधव, जिल्ह्याचे नेते गणेशजी गायकवाड, अशोक सरवते, कमलशील म्हस्के, नवनिर्वाचित जि. युवक सरचीटणीस अतुल सोनवणे, प. मा. वि. अध्यक्ष दादासाहेब वाघमारे, नवनिर्वाचित ता. युवक अध्यक्ष अंकुश सोनवणे, सुनील ओव्हाळ, नवनिर्वाचित प. मा. युवक संपर्क प्रमुख शरद सोनवणे, कार्याध्यक्ष निलेश यादव, सरचिटणीस रमेश घोडके, युवक उपाध्यक्ष सुशांत कदम उत्तम गायकवाड, दशरथ कदम, मारुती कदम, युवा नेते गणेश गायकवाड, अविनाश रोकडे, प्रदीप वाघमारे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आर. पी. आय. पवन मावळ विभागाचे अध्यक्ष पदी निवड झाल्या नंतर अरविंद रोकडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून आपल्यावर पक्ष श्रेष्ठीनी जो विश्वास दाखवला व पक्षात काम करण्याची संधी दिली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व विभागात युवकांना संघटित करून यापुढे पक्षाची ताकत वाढवण्याचे काम केले जाईल व सामाजिक कार्याला विशेष महत्व दिले जाईल. त्याचप्रमाणे विभागातील वंचितांना न्याय देण्यासाठी वेळोवेळो पुढाकार घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे आपले मत मांडले.