आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारनेर:-पत्रकार वसंत रांधवण यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पत्रकार वसंत रांधवण यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे पुरस्कार सोहळा.

दि.११,पारनेर (राजकुमार इकडे) अहिल्यानगर पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील रहिवासी पारनेर चे भूमिपुत्र व दैनिक अक्षराज मेडियाचे अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष पत्रकार वसंत रांधवण यांना आधार फाउंडेशन व एस आर २४ न्यूज मीडिया समूह राहुरी अहिल्यानगर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार २०२६ करीता नुकतीच निवड करण्यात आली असल्याचे आधार फाउंडेशनचे आयोजक तथा कार्याध्यक्ष रमेश खेमनर यांनी वसंत रांधवण यांना निवडीचे पत्र देऊन कळविले आहे.
शनिवार दि. १३ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी विविध क्षेत्रातील नामवंत लेखक व कवी आणि मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात समाजरत्न पुरस्कार २०२६ देऊन वसंत रांधवण यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
पत्रकार वसंत रांधवण हे आहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पत्रकार असून निर्भिडपणे ग्रामीण भागातील प्रश्न मांडत आहे. गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार क्षेत्रात नाविन्यपूर्ण व आदर्श पत्रकार म्हणून काम करत आहेत. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पारनेर तालुका उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहे. समाज सुधारकांची जयंती साजरी करणे, विविध शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा मोलाचा वाटा असून मागील १७ वर्षांपासून सामाजिक कार्यात सातत्यपूर्ण योगदान आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
यापूर्वी रांधवण यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वसंत रांधवण यांना राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. या निवडीचे पत्र आधार फाउंडेशन चे सचिव सोमनाथ वाघ व आयोजक तथा कार्याध्यक्ष रमेश खेमनर यांनी दिले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button