श्रीरामपूर:-रात्री १० नंतर डीजे-वाद्यांवर कारवाई; आयोजकांसह मंगल कार्यालय मालकांवर गुन्हे दाखल होणार राहुरी पोलिसांची साउंड सिस्टीम चालक व मंगल कार्यालय मालकांची बैठक.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

रात्री १० नंतर डीजे-वाद्यांवर कारवाई; आयोजकांसह मंगल कार्यालय मालकांवर गुन्हे दाखल होणार राहुरी पोलिसांची साउंड सिस्टीम चालक व मंगल कार्यालय मालकांची बैठक.
श्रीरामपूर / माळेवाडी (RPs स्टार न्यूज प्रतिनिधी)
अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दि. ११ मे २०२६ रोजी राहुरी तालुक्यातील साउंड सिस्टीम चालक तसेच मंगल कार्यालय मालकांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
या बैठकीत रात्री १० नंतर कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजवणे, डीजे, फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीसाठी ध्वनीप्रदूषण करणारी उपकरणे वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन केल्यास साउंड सिस्टीम चालक, मंगल कार्यालय मालक तसेच संबंधित आयोजक व ग्राहकांवर ध्वनी प्रदूषण कायदा २००२ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.
पोलीस प्रशासनाने नागरिकांनी कायद्याचे पालन करून ध्वनीप्रदूषण टाळावे व सामाजिक शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.




