कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारनेर:-सुपा येथील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मनसे आक्रमक उड्डाणपुलासह सिग्नलची मागणी.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सुपा येथील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मनसे आक्रमक उड्डाणपुलासह सिग्नलची मागणी.

पारनेर सुपा (राजकुमार इकडे): नगर-पुणे महामार्गावरील सुपा येथे दररोज होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या कोंडीचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुक्याच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उड्डाणपूल व पर्यायी मार्गाची मागणी करण्यात आली आहे मनसे तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांनी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अहिल्या-नगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुपा येथील शासकीय विश्रामगृह ते सुपा औद्योगिक वसाहत या दरम्यान महामार्गावर दररोज वाहतुकीची कोंडी होते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णवाहिकांनाही तासन्तास खोळंबून राहावे लागते. इमर्जन्सीच्या वेळी याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.
तसेच महामार्गावरील वाहतूक टाळण्यासाठी अनेक वाहने गावातील छोट्या रस्त्यांवरून जातात. त्यामुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत:
1. *शासकीय विश्रामगृह ते सुपा MIDC पर्यंत उड्डाणपूल किंवा पर्यायी मार्ग* तातडीने करण्यात यावा.
2. *सुपा चौकात सर्कल व सिग्नल यंत्रणा* बसवून शाळकरी विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी”नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असताना प्रशासनाने डोळेझाक करू नये. तातडीने कार्यवाही न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांनी दिला आहे यावेळी सुपा शहर अध्यक्ष अक्षय सुर्यवंशी, शाखा अध्यक्ष रमेश साबळे, पारनेर शहर अध्यक्ष सतिश म्हस्के, तालुका सचिव नारायण नरवडे, तालुका उपाध्यक्ष विरेंद्र थोरात यांच्या सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button