कराड:-स्व.शेठ.रा.की.लाहोटी कन्या प्रशालेची शतप्रतिशत यशाची परंपरा कायम; दहावी निकालात उज्ज्वल यश.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

स्व.शेठ.रा.की.लाहोटी कन्या प्रशालेची शतप्रतिशत यशाची परंपरा कायम; दहावी निकालात उज्ज्वल यश.

कराड:- येथील स्व.शेठ.रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला, कराड हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत यंदाही शंभर टक्के निकालाची दिमाखदार परंपरा कायम राखत शैक्षणिक गुणवत्तेचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. विद्यार्थिनींच्या अथक परिश्रम, शिक्षकांचे दर्जेदार मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्यामुळे प्रशालेने हे घवघवीत यश संपादन केले असून संपूर्ण कराड परिसरातून प्रशालेचे कौतुक होत आहे.
यंदाच्या निकालात कु. हिंगमिरे अंजली नंदकिशोर हिने ९८.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. गोरे शर्वरी दादासाहेब हिने ९८.६० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर कु. कणसे दीक्षा कृष्णत हिने ९७.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवून प्रशालेच्या यशात मानाचा तुरा रोवला.
तसेच कु. गुरव सई उमेश व कु. पाटील मृदुला संदीप यांनी प्रत्येकी ९६.६० टक्के, तर कु. काकडे अनुराधा दीपक व कु. पाटील वेदांतिका चंद्रकांत यांनी प्रत्येकी ९६.४० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यशाची नोंद केली.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे संस्कृत विषयात तब्बल १३ विद्यार्थिनींनी शंभरपैकी शंभर गुण मिळविले, तर गणित विषयात कु. मृदुला संदीप पाटील हिने १०० पैकी १०० गुण प्राप्त करून प्रशालेच्या गुणवत्तेची चमक अधोरेखित केली.
या उज्ज्वल यशाबद्दल शिक्षण मंडळ कराडचे सर्व पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
प्रशालेच्या या नेत्रदीपक यशामुळे कराडच्या शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा स्व.शेठ. रा.की.लाहोटी कन्या प्रशालेने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.




