आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-“दिव्यांगांसाठी दिलासा; आता श्रीरामपुरातच मिळणार वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र!”

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“दिव्यांगांसाठी दिलासा; आता श्रीरामपुरातच मिळणार वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र!”

श्रीरामपूर / माळेवाडी (RPs स्टार न्यूज प्रतिनिधी) : कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
कोपरगाव, राहाता, संगमनेर, अकोले आणि श्रीरामपूर या पाच तालुक्यांतील दिव्यांग नागरिकांना आता वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ७० ते १०० किलोमीटर दूर जिल्हा रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी श्रीरामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातच तपासणी व प्रमाणपत्र वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दिव्यांग नागरिकांना प्रवासाचा होणारा शारीरिक व मानसिक त्रास कमी व्हावा, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली होती. आरोग्य विभागाने या मागणीस मंजुरी दिल्याने हजारो दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.
श्रीरामपूर हे उत्तर नगर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने आजूबाजूच्या पाच ते सात तालुक्यांतील नागरिकांना येथे ये-जा करणे अधिक सोयीचे ठरणार आहे. स्थानिक स्तरावर ही सुविधा उपलब्ध झाल्याने दिव्यांग नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button