वडगाव:-(पुसेसावळी)-मुलींनी मारली बाजी; जयराम स्वामी विद्या मंदिराचा दहावीचा निकाल ९७.७४ टक्के “गुणवत्तेची परंपरा कायम; केंद्रात विद्यालयाचा अव्वल मान”
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मुलींनी मारली बाजी; जयराम स्वामी विद्या मंदिराचा दहावीचा निकाल ९७.७४ टक्के
“गुणवत्तेची परंपरा कायम; केंद्रात विद्यालयाचा अव्वल मान”

वडगाव जयराम स्वामी, ता.खटाव येथील हुतात्मा मंडळाच्या जयराम स्वामी विद्या मंदिराने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९७.७४ टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत केंद्र व परिसरात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. यंदाच्या निकालात मुलींनी सरस कामगिरी करत विद्यालयाच्या गुणवत्तेचा ठसा उमटवला.
विद्यालयातील राजनंदनी नागमळ हिने ९५.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सानिका भोसले हिने ९४.७० टक्के गुणांसह द्वितीय, तर अनुष्का माळी व प्रीती पवार यांनी प्रत्येकी ९३.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. पायल पवार हिने ९४.२० टक्के गुणांसह चतुर्थ, तर रुद्र होऊनराव याने ९१.५० टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावला.
तसेच गायत्री निकम (९१%), गायत्री माळी (९०%), मिताली घारगे (९०%), श्रावणी चव्हाण (८९.६०%), वेदिका जाधव (८९.६०%), सृष्टी माळवे (८९.२०%), श्रेया सडके (८८.८०%), सई भोसले (८८%), अथर्व पवार (८७.६०%), श्रेया जाधव (८७.७०%), स्वरांजली थोरात (८७.४४%), आर्यन गुरव (८७.४५%), शौर्य थोरात (८६.४५%), संस्कृती कदम (८६%), श्रावणी शिंदे (८५.४५%), धनराज चव्हाण (८५.२०%), रुद्रविराज शिंदे (८५.२०%) व समीक्षा येवली (८५.२०%) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.
या निकालात ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे ९ विद्यार्थी असून ८५ ते ९० टक्क्यांदरम्यान १६ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास घारगे, उपाध्यक्ष अंकुश घारगे, सचिव अरुण जाधव, सहसचिव दीपक थोरात, सर्व संचालक, प्राचार्य जयवंतराव घारगे, पर्यवेक्षक सुनील पुजारी तसेच शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले.




