आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वडूज:-येरळवाडी माळराना वर श्वान धावणे स्पर्धेने डोळ्याची पारणे फिटली.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299,

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

येरळवाडी माळराना वर श्वान धावणे स्पर्धेने डोळ्याची पारणे फिटली.

वडूज दि: सध्या मनुष्याच्या सर्व स्पर्धेपेक्षा सर्वाधिक आकर्षण हे पाळीव प्राण्यांच्या विविध स्पर्धेने निर्माण झालेले आहे. त्यामुळे प्राण्यांच्या स्पर्धा पाहताना त्यांच्यातील कलागुणांना संधी देण्याचे काम अनेक जण करतात. खटाव तालुक्यातील येरळवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्वान धावण्या स्पर्धेचे नेटके नियोजन केले होते. या वेळेला श्वान व इतरांनी आपली कला कौशल दाखवल्याने अक्षरशः डोळ्याची पारणे फिटली.
येरळवाडी येथील माळरानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये नर-मादी मिळून चारशे फूट अंतराच्या ट्रॅकवरसुमारे ५० श्वानांनी सक्रिय सहभागी होऊन ही स्पर्धा पूर्ण केली. यामध्ये सिल्वर जेट, काशी, कोयला, कोकण कन्या, जानू ,दुर्गा ,बुलेट गर्ल, ज्युनिअर शुभ्रा ,माया, मितवा, स्माईल, सिमरन, नयना ,ब्लॅक क्वीन, मनी, तपस्या तसेच चेतक, लाला, हँडसम बॉय, ब्लॅक गरुड, शूटर, टायगर, मॅजिक, बॉस, रॉकी, हमला अशा विविध श्वानांनी भाग घेतला. क्रांती रेसिंग क्लब, सह्याद्री रेसिंग क्लब, जय मल्हार रेसिंग क्लब, जॉन्सन रेसिंग क्लब, छत्रपती नरवीर ग्रुप, सरकार ग्रुप, रॉयल ग्रुप व श्री महालक्ष्मी रेसिंग क्लब अशा विविध क्लबने सुद्धा मोठे योगदान दिले होते.
या ठिकाणी प्रत्येकी अडीचशे रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले होते तसेच ट्रॅक बनवण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये आठ ते दहा फेऱ्या माराव्या लागत होत्या तसेच प्रत्येकाचे व्हिडिओ शूटिंग करून घेतले जात होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी येरळवाडीचे प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पाटील गणेश चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे अमोल गंगावणे, मिलिंद कांबळे, रोहन बोडरे ,अमोल सावंत, शंभूराजे खंदारे, हर्षल शेळके ,हेमंत पाटोळे, सह्याद्री सुर्वे, किरण पवार ,श्रीकांत शेलार ,संदीप मदने, सनी चव्हाण, ओंकार मदने यांच्यासह बडेकर व परिसरातील शॉनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ठिकाणी या स्पर्धेसाठी सातारा, सांगली, सोलापूर, येथील पाळीव प्राणी प्रेमी उपस्थित होते. पुसेगाव, पिंगळी, सातारा, कोंडवे, गुरसाळे, मासुर्णे, येरळवाडी, वरकुटी- मलवडी, उंबरमळे, वाई ,रहिमतपूर, दगतवाडी, अंबवडे, मायणी, बेडवडे येथील पाळीव प्राणी प्रेमी व श्वान आले होते. त्यांची चांगली देखभाल करण्यात येत होती. प्रत्येक स्पर्धकाची स्पर्धेपूर्वी तयारी करून घेतली जात होती. अशा स्पर्धेमुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये बैलगाडी शर्यतीनंतर या शर्यतीला महत्त्व प्राप्त झालेले आहे. अशी माहिती पत्रकार दत्ता इनामदार,युवा कार्यकर्ते धनंजय चव्हाण यांनी दिली.

————————————————-
फोटो कॅप्शन येरळवाडी माळरानावर सॉंग क्षणचित्रे (छाया- अजित जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button