सातारा:-अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तालुका यादीत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा समावेश करावा:-अनिलकुमार बुवासाहेब कदम.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तालुका यादीत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा समावेश करावा:-अनिलकुमार बुवासाहेब कदम.

सातारा:- सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यात मे ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे संततधार पावसामुळे पिकांचे, फळबागांचे, भाजीपाला, शेतजमीन, विहिरी,पशुधन कुक्कुटपालन, शेळ्या मेंढ्या,गुरांचे गोठे, झोपड्या,पालं, इत्यादी अनेक प्रकारच्या प्रचंड अपरिमित नुकसान झाले आहे.शेतकरी, शेतमजूर, शेळ्या मेंढ्या गुरांचे धनगर समाजातील पशुपालक यांचे आर्थिक नुकसान झाल्याने अतिशय दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे फलटण तालुक्याचा अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तालुका यादीत खास बाब म्हणून तातडीने समावेश करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई मेल व्दारे केली आहे.
याबाबत यापूर्वी महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी ई मेल व्दारे याबाबत सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवली होती.फलटण तालुक्याला अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे बाबत विनंती केली होती.
महाराष्ट्र शासनाच्या दिनांक ०९/१०/२०२५ रोजीच्या शासन निर्णय मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तालुका यादीत खास विशेष बाब म्हणून फलटण तालुक्याचा समावेश करावा अशी मागणीही महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी पुन्हा एकदा केली आहे.
फलटण तालुक्याचा अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तालुका यादीत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा समावेश करावा अन्यथा शेतकरी शेतमजूर दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन व्यवसाय करणारे व्यावसायिक यांच्या हितासाठी नाईलाजाने उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागेल अशी मागणीची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी ई मेल व्दारे महाराष्ट्र शासनाला पाठवले आहे.




