ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कणकवली:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या विचारांवर चालत राहणार – मंत्री नितेश राणे.

पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या विचारांवर चालत राहणार – मंत्री नितेश राणे.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कणकवली येथील बुध्दविहारात महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी केले अभिवादन.
कणकवली :
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा मिळालेली आहे. त्यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर राहिलेला आहे. त्यांनी आपल्या सर्वांना मानव म्हणून जगण्याचा हक्क डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळालेला आहे. आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांच्या पवित्र स्थानी नतमस्तक झालो. आपला देश आणि आपला राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर आणि विचारांवर सदैव चालत राहणार असल्याची भावना पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली.
कणकवली येथील बुध्द विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.तसेच बुध्द विहार मधील तथागत गौतम बुध्द यांच्या मुर्तीस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत अभिवादन केले. यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो… अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे , माजी नगराध्यक्षा मेघा गांगण , माजी नगरसेवक संजय मालंडकर , विराज भोसले , तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री , प्रकाश सावंत , औदुंबर राणे , गौतम खुडकर , किशोर राणे , राकेश राणे , संतोष पुजारे , निसार शेख , अंकुश कदम , सुशील कदम , मयुरी चव्हाण , मेघा सावंत , आर्या राणे , प्रतिक्षा सावंत , मनस्वी ठाणेकर , किरण जाधव यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button