क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-केबल चोरीच्या मालिकेला पूर्णविराम! वाई पोलिसांची धडक कारवाई; २.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-केबल चोरीच्या मालिकेला पूर्णविराम! वाई पोलिसांची धडक कारवाई; २.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त.

 सातारा प्रतिनिधी सारिका गवते

वाई, दि.०२ : वाई तालुक्यात सुरू असलेल्या केबल चोरीच्या घटनांचा अखेर वाई पोलिसांनी पर्दाफाश केला असून, सराईत आरोपीला अटक करत २,१६,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
०२ मार्च २०२६ रोजी मौजे आसरे (ता. वाई) येथे केबल चोरीची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला.
तपासादरम्यान अक्षय विलास पायगुडे (रा. व्याहाळी, ता. वाई) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने केबल चोरी केल्याची कबुली दिली असून, वाई व सातारा तालुक्यातील विविध ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचेही उघड झाले आहे.
पोलिसांनी आरोपीकडून ४२ किलो केबल, सुमारे ९६० मीटर वायर आणि चोरीसाठी वापरलेले वाहन जप्त केले. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत २,१६,८०० रुपये इतकी आहे. आरोपीकडून वाई पोलीस ठाण्यातील ५ गुन्हे उघडकीस आले असून, त्याच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथकाची कामगिरी :
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख (सातारा), अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुधीर वाडुंज, पोलीस उपनिरीक्षक नितीन कदम, हेड कॉन्स्टेबल हेमंत शिंदे, पोलीस नाईक विशाल शिंदे, कॉन्स्टेबल श्रावण राठोड, संदीप बेनके, गणेश जाधव आणि इतर कर्मचाऱ्यांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली.
या यशस्वी कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले असून, वाई तालुक्यातील गुन्हेगारीवर वचक बसवण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

2) वाई:-प्रेमाच्या आमिषातून बलात्काराचा आरोप; पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता.

वाई | प्रतिनिधी
वाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी बलात्कार व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.
पारगाव (ता. खंडाळा) येथील मोबीन अतिउल्ला खान (वय २१) याच्याविरुद्ध पीडित महिलेने दिनांक २५ मार्च २०२४ रोजी खंडाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीत आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले असल्याचा आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम ३७६, ३७६(२)(एन) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा कलम ३(१)(w)(i)(ii), ३(२)(v) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खंडाळा पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने एकूण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला.
⚖️ न्यायालयाचे निरीक्षण:
प्रकरणात आरोपीविरुद्ध सबळ व ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच फिर्याद दाखल करण्यात विलंब झाल्याचाही विचार करण्यात आला.
या कारणांमुळे न्यायालयाने आरोपी मोबीन अतिउल्ला खान याची निर्दोष मुक्तता केली.
बचाव पक्षाची बाजू:
या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. तेजस मोडक आणि ॲड. ऋषिकेश सकुंडे यांनी प्रभावीपणे कामकाज पाहिले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button