क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

औरंगाबाद:-फुलंब्री तालुक्यातील पत्रकाराला मारहाण.

प्रतिनिधी गजानन काळे औरंगाबाद:-9834313401

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

फुलंब्री तालुक्यातील पत्रकाराला मारहाण.

प्रतिनिधी/ औरंगाबाद एन, टीव्ही. न्यूज चैनल च्या पत्रकाराला मारहाण/ एन .टीव्ही न्यूज चॅनल चे पत्रकार श्री योगेश पांडुरंग शेळके वय वर्ष 35 राहणार जानेफळ तालुका फुलंब्री हे आपलं पत्रकारितेचे कार्य करत असताना गावातील काही नागरिकांनी न्यूज प्रसारण करत असताना आमची नावे का घेतो हा राग मनात धरून आज काही कारण नसताना या पत्रकाराला सोमीनाथ देविदास खिल्लारे ,पंढरीनाथ देविदास खिल्लारे, आजिनाथ रतन खिल्लारे, संतोष कचरू खिल्लारे, व आरती खिल्लारे, या सर्वांनी मिळून बेदम अशी मारहाण केली योगेश शेळके हे आपल्या गावातील तसेच तालुक्यातील होणाऱ्या विविध घडामोडी, आंदोलने, आणि अडचणी याबाबत सतत बातम्या लावत असतात परंतु काही वेळेस सर्वांचीच नावे बातम्यांमध्ये घेता येत नाहीत तरी या लोकांनी असा गैरसमज करून घेतला की योगेश शेळके हे जाणून-बुजून बातम्यांमध्ये आमचे नावे घेत नाहीत व केवळ आमच्या विरोधात बातम्या लावतो यामुळे या वरील आरोपींनी पत्रकाराला मारहाण केली ही घटना घडल्याबरोबर महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघाचे सर्व पदाधिकारी तालुका खुलताबाद येथे हजर होऊन त्यांनी पोलीस ठाणे खुलताबाद येथे वरील आरोपींच्या विरोधात लेखी तक्रार देऊन तसेच पत्रकार संरक्षण कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पडले त्यानुसार कलम 143, 148, 324, 147, 328 ,504 ,506, आय.पी.सी. व पत्रकार संरक्षण कायदा अधिनियम 2019 प्रमाणे वरील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून माननीय उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे पुढील तपास कामी हे प्रकरण सोपविण्यात आले असून आरोपींना ताबडतोब अटक करून त्यांना लवकरात लवकर गजाआड करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button