पारनेर:-(सुपा)-रांजणगाव येथील विद्युत पुरवठा अखंडीत पणे सुरु- देशमुख.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पारनेर:-(सुपा)-रांजणगाव येथील विद्युत पुरवठा अखंडीत पणे सुरु- देशमुख.

पारनेर,सुपा (राजकुमार इकडे)
पारनेर तालुक्यातील रांजणगाव हे पारनेर तालुक्यातील सुपा गटातील सर्वात मोठे गाव असून शेतजमीन ही मोठ्या प्रमाणात आहे वर्षानुवर्षे चाललेल्या विजेचा लपंनडाव प्रत्येक वर्षी पाहण्यास मिळतो. शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली असून विद्युत पुरवठा पुरेसा नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला दिसतो. परंतु तालुक्यातील राजकीय बदल झाल्याने नवीन नेतृत्वाला राहुल शिंदे पाटील यांची खंबीर साथ मिळाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पारनेर तालुक्याच्या विकास कामांना भरपूर निधी मिळवून दिला. तालुक्यातील सार्वजनिक कामासाठी भरपूर प्रमाणात निधी मिळाल्याने वास्तव चित्र आज पाहावयास मिळते.
सुपा पंचक्रोशीतील रांजणगाव येथे ही वीजपुरवठा खंडित होता. पंचक्रोशीतील शेतकरी विजेचे चाललेला लपंनडावाला कंटाळलेली असताना रांजणगाव चे कणखर नेतृत्व म्हणजे राहुल दादा शिंदे पाटील यांच्या विचाराने प्रेरित झालेले गावचे सरपंच महेश देशमुख यांनी रांजणगाव साठी विद्युत पुरवठा हा अखंडितपणे चालू राहण्यासाठी सुपा येथील विद्युत अभियंता श्री पिसाळ साहेब यांना निवेदन देऊन गावासाठी अखंडित विद्युत पुरवठा सुरू राहण्यासाठी पाठपुरावा करून रांजणगाव पंचक्रोशीतील विद्युत पुरवठा यापुढे कधीही खंडित होणार नाही. असे आश्वासन सुपा महावितरणाचे विद्युत अभियंता श्री पिसाळ साहेब यांना दिले निवेदन करते गावचे सरपंच महेश देशमुख उपसरपंच शिवाजी शिंदे शरद सरोदे बाबा जवक अनिल जवक बंटी साबळे भाऊ देशमुख दत्ता लोणकर मोहन लोणकर मनोहर साबळे उत्तम पवार नानासाहेब अल्हाट अभिषेक देशमुख अनिल गाढवे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



