ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

महाबळेश्वर तालुक्यात भारतीय बुद्ध महासभेच्या चार शाखांची पुनर्नियुक्ती; पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार.

पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

महाबळेश्वर तालुक्यात भारतीय बुद्ध महासभेच्या चार शाखांची पुनर्नियुक्ती; पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार.

तालुका प्रतिनिधी उत्तम भालेराव

महाबळेश्वर : भारतीय बुद्ध महासभा महाबळेश्वर तालुका यांच्या वतीने दि. १५ मार्च २०२६ रोजी आयोजित बैठकीत तालुक्यातील चार शाखांची पुनर्नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली. या वेळी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका अध्यक्ष नितीन गायकवाड यांनी भूषविले. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शाखा क्रमांक १, २, ३ व ४ या शाखांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
शाखा क्रमांक १ साठी अध्यक्षपदी लक्ष्मण मोरे, कोषाध्यक्षपदी घोंडिबा कदम तर सचिवपदी शशिकांत यादव यांची निवड करण्यात आली. शाखा क्रमांक २ साठी अध्यक्षपदी प्रकाश सपकाळ, कोषाध्यक्षपदी लक्ष्मण कदम आणि सचिवपदी सरखाराम कदम यांची निवड झाली. तसेच शाखा क्रमांक ४ साठी अध्यक्षपदी सुरेश कांबळे, कोषाध्यक्षपदी उत्तम कदम आणि सचिवपदी घोंडिबा पवार यांची नियुक्ती करण्यात आली.
या सर्व पदाधिकाऱ्यांचे समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी बुद्ध, धम्म व आंबेडकरी विचारांच्या प्रसारासाठी संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महासचिव अनिल सपकाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन शशी यादव यांनी मानले.
या प्रसंगी जिल्हा संस्कार सचिव दिलीप यादव, संस्कार उपाध्यक्ष प्रकाश सपकाळ, माजी संस्कार उपाध्यक्ष संपत मोरे, लक्ष्मण मोरे, जगण कदम, रविंद्र घाडगे, सुरेश कांबळे, घोंडिबा यादव, एकनाथ भालेराव, शांताराम यादव, सिद्धार्थ यादव, संपत कांबळे, सुमन जाधव, सिद्धार्थ गायकवाड तसेच भीम क्रांती युवक संघटनेचे अध्यक्ष संतोष भालेराव, शरद कदम, अंकित भालेराव, वंचित बहुजन आघाडी तालुका महाबळेश्वर अध्यक्ष उत्तम भाले राव यांच्यासह अनेक धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, आगामी काळात समाजकार्य अधिक जोमाने करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button