मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
लोहगाव वार्ताहर( कोंडीराम नेहे)
संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ उकिर्डे यांना आदर्श गाव राळेगणसिद्धी येथे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते समाज रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले राळेगणसिद्धी येथे जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त मानवाधिकार फाउंडेशनचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले या अधिवेशनात दिनदर्शिका प्रकाश व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला ध्यान तज्ञ व समुपदेश डॉ. दिनेश दीपेश पष्टे संचलित मानवाधिकार फाउंडेशन ही राष्ट्रीय संस्था कार्याच्या बळावर संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात आपले नाव पोचवले आहे सामाजिक सांस्कृतिक मानव व हित जपणारी समाजसेवा करणारी तसेच भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणारी संविधान जनजागृती करणारी एकमेव संस्था आहे .हा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष शंकर आप्पा जाधव हे होते आमदार निलेश लंके यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ उकिर्डे यांना संविधान पत्र व गौरव पत्र देऊन देऊन समारोद्र समाज रत्न पुरस्कार बहाल करण्यात आला यावेळी बोलताना निलेश लंके म्हणाले की मानवाधिकार फाउंडेशनच्या खऱ्या अर्थाने समाजसेवा करीत आहे सर्वसामान्य हक्कासाठी लढत आहे तळागाळातील खेड्यापाड्यात जाऊन समाज कार्य करणाऱ्या व्यक्तीचे कार्य बघून अशा समाजसेवकांना पुरस्कर देऊन त्यांना सामाजिक करण्याचे प्रेरणा व प्रोत्साहन देत आहे. यावेळी संस्थेचे सचिव रेणुका ताई दिघे. संगमनेर तालुका चे लहू सातपुते. आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ उकिर्डे यांनी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात. आमदार सुधीर तांबे. इंद्रजीत थोरात नगराध्यक्ष दुर्गाबाई तांबे डॉ. राजश्रीताई थोरात. सत्यजित तांबे रणजीत देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे