गोंदिया:-पतीच्या मैत्रिणीला संपवण्यासाठी पत्नीनेच दिली, 13 लाखांची सुपारी अखेर गोंदिया पोलिसांनी 6 आरोपींना ठोकल्या बेड्या!
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

गोंदिया:-पतीच्या मैत्रिणीला संपवण्यासाठी पत्नीनेच दिली, 13 लाखांची सुपारी अखेर गोंदिया पोलिसांनी 6 आरोपींना ठोकल्या बेड्या!

(गोंदिया जिल्हा) प्रतिनिधी. गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या बोंदरानी जंगल परिसरांत 14 नोव्हेंबर 2026 रोजी पुण्यातील एका 26 वर्ष विमान कंपनीत कार्यरत असणारी वर्षा तुरकर (वय 26) हिची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. पोलीस तपासादरम्यान पतीच्या असलेल्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून 13 लाखांची सुपारी देवुन हा कट रचल्याचे समोर आले आहे. 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी वर्षा तुरकर आणि व्यवसायिक नितेश अग्रवाल सोबत बोंदराणी परिसरांत गेले असताना अज्ञात हल्यकरांनी हल्लेखोरांनी हल्ला केला. आणि चाकूने सपासप वार करून वर्षाची हत्या केली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून नितेश अग्रवाल चे वर्षासोबत असलेले प्रेम संबंध पत्नीला सहन न झाल्याने नितेशची पत्नी मोना अग्रवाल हिने आरोपींना 13 लाखांची सुपारी दिली होती. अखेर या प्रकरणाचा गोंदिया पोलिसांकडून जलद गतीने तपास करून या प्रकरणात जवळपास 6 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिली आहे.



