आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारनेर:-वाढदिवसाचा अवांतर खर्च टाळून मुक्या प्राण्यांसाठी पाणवठ्यात पाणी.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पारनेर:-वाढदिवसाचा अवांतर खर्च टाळून मुक्या प्राण्यांसाठी पाणवठ्यात पाणी.

पारनेर तालुक्यातील सुपा येथे अन्विंता (लक्ष्मी) अविनाश पवारच्या प्रथम वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी.

सुपा, ता. पारनेर (राजकुमार इकडे)सध्या अनेक ठिकाणी जाणवत असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यातील सुपा येथील अविनाश पवार परिवाराने एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला आहे.

त्यांची कन्या कु. अन्विंता (लक्ष्मी) अविनाश पवार हिच्या प्रथम वाढदिवसानिमित्त होणारा केक, डीजे व इतर अवांतर खर्च टाळून त्यांनी मुक्या प्राण्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. रात्रीच्या वेळी टँकरच्या सहाय्याने रानातील, शेतातील पाणवठ्यांमध्ये पाणी टाकून वन्यजीव, पक्षी यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवण्याचा छोटासा प्रयत्न त्यांनी केला.

“माझ्या लेकीच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हाला मोठा खर्च करायचा नव्हता. दुष्काळ पाहता लोकांनाही संदेश द्यायचा होता की अशा परिस्थितीत पाण्याचे महत्व काय आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा वायफळ खर्च टाळून प्राण्यांना पिण्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे,” असे अविनाश पवार यांनी सांगितले.

त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सुपा व पारनेर तालुक्यात सर्व स्तरातून कौतुक होत असून, ”वाढदिवस असाही साजरा करता येतो” हा प्रेरणादायी संदेश त्यांनी समाजाला दिला आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button