क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाचोरा:-कळमसरा येथील शेतातील गोडाऊन मधील कापूस चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना अटक – स.पो.नि.कल्याणी वर्मा यांची कामगिरी!

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पाचोरा:-कळमसरा येथील शेतातील गोडाऊन मधील कापूस चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना अटक – स.पो.नि.कल्याणी वर्मा यांची कामगिरी!

(जळगांव जिल्हा) प्रतिनिधी. जळगांव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यांतील पिंपळगांव हरेश्वर पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा या नेहमीच प्रयत्नशील दिसून येतात. पोलीस ठाण्यात इंट्री झाल्यापासून हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था त्यांनी चांगलाच ठेवला आहे. तर अवैध धंद्यावरही त्यांची चांगलीच करडी नजर दिसून येत आहे. पिंपळगांव हरेश्वर पोलीस ठाण्याने नुकतीच कापूस चोरी आणि खंडणीच्या गुन्ह्यासह अनेक महत्त्वाच्या कारवायांमध्ये चांगलेच यश मिळवले आहे. कळमसरा शिवारातील शेतातून चोरीस गेलेला सुमारे 40 हजार रुपये किंमतीचा 5 क्विंटल कापूस पिंपळगांव हरेश्वर पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. श्रावण शांताराम कोळी (वय 27 ) रा. कळमसरा ता. पाचोरा ) आणि विजय बाळू सोनवणे (वय 30) रा. मालखेडा ता. जामनेर ) यांना ताब्यात घेवुन अधिक चौकशी केली असता त्यांनी कापूस चोरीची कबुली दिली आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिंवरे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक निखाते उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा पो. कॉ. तात्याबा नांगरे पो.कॉ. शांतीलाल पांगरे पो.कॉ. योगेश भिलखांडे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला पिंपळगांव हरेश्वर पोलिसांच्या या कामगिरीमुळे शेतकरी वर्गांतून समाधान व्यक्त होत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button