कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

श्रीरामपूर:-आकारी पडीत शेतकऱ्यांनी फोडले फटाके; मूळ मालकांना जमीन परत देण्याच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत!

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) श्रीरामपूर:-आकारी पडीत शेतकऱ्यांनी फोडले फटाके; मूळ मालकांना जमीन परत देण्याच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत!

“शेतकऱ्यांचा लढा अखेर यशस्वी… संघर्षाला मिळाले फळ, जमिनी परत मिळण्याचा मार्ग मोकळा!”

माळेवाडी (RPS स्टार न्यूज प्रतिनिधी)
तालुक्यातील हरेगाव येथील आकारी पडीत जमिनी त्यांच्या मूळ मालकांना परत देण्याचा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतल्याने आकारी पडीत शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांनी फटाके फोडून जल्लोषात स्वागत केले.
आंदोलनादरम्यान जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या निर्णयासाठी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांचेही विशेष योगदान असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
टॅगलाईन : “वर्षानुवर्षांचा संघर्ष संपला; आकारी पडीत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला!”
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आकारी पडीत जमिनीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे समोर आल्यानंतर हरेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे तसेच महायुती सरकारचे आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
न्यायालयीन लढ्यातही शेतकऱ्यांना मिळाले बळ
आकारी पडीत जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्यात यासाठी शेतकऱ्यांनी दीर्घकाळ मोठा संघर्ष केला. या लढ्याला न्यायालयीन पातळीवरही दिशा मिळाली.
या प्रकरणातील पहिले याचिकाकर्ते गिरीधर आसणे यांच्यावतीने ॲड. अजित काळे पाटील यांनी बाजू मांडली. तसेच दुसरे याचिकाकर्ते डॉ. शंकरराव मुठे यांच्या वतीने सिनियर कौन्सिल ॲड. विनायक होल यांनी सातत्याने न्यायालयीन बाजू मांडली.
शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी न्यायालयीन लढ्यासोबतच विविध स्तरांवर करण्यात आलेल्या संघर्षाला अखेर सरकारच्या निर्णयामुळे मोठे बळ मिळाले आहे.
टॅगलाईन : “न्यायालयीन लढा, आंदोलन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा… अखेर शेतकऱ्यांच्या संघर्षाला मिळाले यश!”
संघर्षात सहभागी प्रमुख शेतकरी
या लढ्यात भाकचंद मुठे, बाबासाहेब देसाई, भाऊसाहेब मुठे, राजेंद्र मुठे, जयराज मुठे, जय मुठे, हरीभाऊ मुठे, बबन बाबा गोरावी, जयदीप आसणे, राजेंद्र गोसावी, बाळासाहेब मुठे, कैलास खैरे, भाऊसाहेब गोसावी, ज्ञानदेव मुठे, आबासाहेब गोसावी, गजानन गोसावी, नवनाथ भोंडगे, प्रशांत शिंदे, कृष्णा शिंदे, योगेश घोडचोर, रंजक मुठे, कुंडिलक पांचपिंड, संदिप मुठे, दिलीप कदम, रंगनाथ कोळसे, रघुनाथ मुठे, बळीराम मुठे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी मोठा सहभाग घेतला.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा
हरेगाव येथील आकारी पडीत जमिनी मूळ मालकांना परत देण्याच्या निर्णयामुळे संबंधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

2) नेवासा:-एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीचे राष्ट्रीय स्पर्धेत यश.

नेवासा येथील ५६ व्या स्पर्धेत ६९ विद्यार्थ्यांची देशात पहिल्या दहाम ध्ये बाजी.

नेवासा ( RpS स्टार न्युज प्रतिनिधी ) नेवासा येथे संपन्न झालेल्या ५६ व्या नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत श्रीरामपुरच्या एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे . राज्यभरातून सुमारे बाराशे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता त्यामध्ये श्रीरामपूर आणि परिसरातील ९९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यापैकी तब्बल ६९ विद्यार्थ्यांनी देशात पहिल्या दहामध्ये स्थान पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे या स्पर्धेत देवयानी होते प्रत्यूष पटारे , संस्कृती मागुंडे , आणि श्रेया सदाफळ , या चार विद्यार्थ्यांनी चॅम्पियन पद पटकावले . तसेच अबॅकसचे सर्व स्तर पुर्ण करणाऱ्या १८ विद्यार्थ्यांना यावेळी ‘ अबॅकस ‘ मास्टर या पदवीने गौरवण्यात आले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या संचालित सोनाली ठाणगे यांचे मार्गदर्शन लाभले

राष्ट्रीय स्तरावर अभिमान उंचावला
” हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नसून त्यांच्या अधिक परिश्रम आणि पालकांच्या विश्वासाचे फळ आहे अबँकस केवळ गणित नाही तर एकाग्रता व आत्मविश्वास वाढणारे साधन आहे श्रीरामपूरच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर आमचा अभिमान उंचावला आहे
– सोनाली ठाणगे संचालिका
अबॅकस अकॅडमी श्रीरामपूर

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button