वाई:-जनता शिक्षण संस्थेच्या हीरक महोत्सवानिमित्त कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांचे व्याख्यान.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-जनता शिक्षण संस्थेच्या हीरक महोत्सवानिमित्त कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांचे व्याख्यान.

वाई: दि. २६ ऑक्टोबर २०२६
जनता शिक्षण संस्थेच्या हीरकमहोत्सवा निमित्त दर महिन्याला विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींची विशेष व्याख्याने आयोजित करण्यात येतात. यातील चौथे पुष्प गुंफण्यासाठी सातारच्या कर्मवीर भाऊराव पाटील रयत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के शनिवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता किसन वीर महाविद्यालय प्रांगणात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. सदर समारंभास संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के हे रयत शिक्षण संस्थेमध्ये गेली ३५ वर्षे ज्ञानदानाचे काम करीत आहेत. रयत शिक्षण संस्थेत त्यांनी प्राध्यापक, प्राचार्य, सहसचिव अशी अनेक पदे भूषविली आहेत व सध्या ते कर्मवीर भाऊराव पाटील रयत विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत.
तरी वाई पंचक्रोशीतील आजी-माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून, व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी केले आहे.



