ठाणे शहर:-वरिष्ठ आयपीएस अधिकारी बाळासाहेब पाटील साहेब खाकी वर्दींतला देव माणूस म्हणून ओळख !
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

ठाणे:-वरिष्ठ आयपीएस अधिकारी बाळासाहेब पाटील साहेब खाकी वर्दींतला देव माणूस म्हणून ओळख !

वरिष्ठ आयपीएस अधिकारी बाळासाहेब पाटील साहेब खाकी वर्दींतला देव माणूस म्हणून ओळख ! (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील महाराष्ट्र केडरचे एक वरिष्ठ भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ आयपीएस अधिकारी म्हणून बाळासाहेब पाटील-वाघमोडे यांना खाकी वर्दींतील देव माणूस म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या पोलीस सेवेची सुरुवात 2001 च्या तुकडीचे राज्य पोलीस सेवेतील पोलीस उपाधीक्षक म्हणून त्यांनी सांगली अकोला आणि विदर्भात विविध पदावर सेवा बजावली आहे. (आयपीएस पदोन्नती) ठाणे पोलीस आयुक्तालयात कार्यालयात असताना 2020 मध्ये त्यांना भारतीय पोलीस सेवेत 2014 बॅच) पदोन्नती मिळाली. पालघर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी जनसंवाद अभियान आणि सायबर गुन्हेमुक्त पालघर सारख्या महिमा राबवल्या. मे 2025 मध्ये त्यांची बदली नाशिकच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी झाली होती. या काळातही त्यांनी नागरिकांसाठी सुरक्षा हा whatsapp चॅटबाट सुरू केला होता. आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली होती. सध्या ते ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त पदावर सेवा बजावत आहेत. वरिष्ठ आयपीएस अधिकारी पाटील यांनी आपल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनेक विशेष सेवा पदके भूषवली आहेत. तर त्यांचे सुपुत्र रुद्राक्ष पाटील हे भारताचे आंतरराष्ट्रीय नेमबाज असून त्यांनीही देशासाठी अनेक राष्ट्रीय पदके जिंकली आहेत.




