क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाशी:-विष्णुदास भावे नाट्यगृहात सादर झालेल्या तीन बालनाट्यांना रसिकांचा तुफान प्रतिसाद; प्रथमच बाल्कनी खुली.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाशी:-विष्णुदास भावे नाट्यगृहात सादर झालेल्या तीन बालनाट्यांना रसिकांचा तुफान प्रतिसाद; प्रथमच बाल्कनी खुली.

वाशी – सुलु नाट्यसंस्था (वाशी) आणि एक्सप्रेस हो थिएटर फोरम (पनवेल) यांच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित ‘नादवेध’, ‘सुलु’ आणि ‘ज्युनिअर शरलॉक होम्स’ या तीन बालनाट्यांना रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यामुळे बालनाट्यासाठी प्रथमच नाट्यगृहाची बाल्कनी खुली करावी लागली. गेल्या २० वर्षांपासून रंगभूमीवर कार्यरत असलेले ज्येष्ठ रंगकर्मी श्री. विलास गायकवाड यांनी बालकलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ देत विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवली आहेत. अभिनय आणि रंगभूमीची शिस्त जीवनात सर्वत्र उपयोगी पडते, असे त्यांनी नमूद केले.

तिन्ही नाटकांतून समाजप्रबोधन साधण्यात आले. ‘नादवेध’ मधून “डिजिटल दुनियेचे स्वामी व्हा, गुलाम होऊ नका” हा संदेश देण्यात आला. ‘सुलु’ मध्ये गरीब अनाथ मुलीचे स्वप्न, संघर्ष व वळणे उलगडली, तर ‘ज्युनिअर शरलॉक होम्स’ ने शाळेतील छळामुळे आलेला एकाकीपणा अधोरेखित केला. या सोहळ्याला दिग्दर्शक श्री. रवी वाडकर, ज्येष्ठ अभिनेते राम काजरोळकर, अभिनेते व नृत्यदिग्दर्शक रवी मोरे, शशी तुपे, रवींद्र पाटील, पवळे सर, गीता मॅडम, अभिनेते व दिग्दर्शक महेश्वर भिकाजी तेटांबे, ज्येष्ठ अभिनेते बाबा कांदळगावकर, अमोल देशमुख, डॉ. ललित, सिद्धार्थ ठोकळे आणि जैस्वार सर यांसह सिने-नाट्य क्षेत्रातील अनेक अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व तंत्रज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. विलास गायकवाड यांनी मान्यवर, रसिक प्रेक्षक आणि पालकांचे मनःपूर्वक आभार मानले. आपल्या नाट्यसंस्थेचे नाव आईच्या नावावरून ठेवल्याचा उल्लेख करताना त्यांनी आपल्या जडणघडणीत आईने दिलेल्या खंबीर साथीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दर्जेदार बालनाट्यांची अशीच परंपरा सुरू राहिल्यास आगामी पिढी अधिक प्रगल्भ आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वासह समाजात उभी राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला..

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button