सांगली:-खाकी वर्दीतील ( देव माणूस ) पोलीस अधीक्षक तुषार दोशी !
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सांगली:-खाकी वर्दीतील ( देव माणूस ) पोलीस अधीक्षक तुषार दोशी !

(सांगली जिल्हा) प्रतिनिधी
आपल्या प्रवासात किंवा संपर्कांत असणारी माणसं खांस असतात… आमच्या एसपी साहेबांबद्दल खरंच शब्द कमी आहेत. मी माझं भाग्य समजतो साहेबांकडून मला नेहमीच बोला संभाजी म्हणून आजही आवाज आहे. सातारा जिल्ह्यातून साहेबांची बदली सांगलीला झाली. त्यावेळी माझं मन खूप भावनिक झालं होतं. पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे पोलीस सेवेत नेहमीच प्रयत्नशील दिसून येतात. त्यांनी आजपर्यंत अनेक जिल्ह्यात आणि महत्वाच्या पदावर कर्तव्य बजावले आहे. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांना यश मिळाले आहे. तुषार दोशी हे मूळचे रायगड जिल्ह्यातील आहेत. फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे त्यांनी बी.एस्सी पूर्णता करून त्यांची 2000 साली पोलीस उपअधीक्षक म्हणून निवड झाली. नाशिक येथील प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली पोस्टिंग चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा नक्षलवादी प्रभाव असलेल्या ठिकाणी झाली. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी लातूर,सोलापूर,नवी मुंबई, जालना,सातारा येथे कर्तव्य बजावले आहे. तुषार दोशी यांना 2014 साली पदोन्नतीने ते पोलीस अधीक्षक झाले त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून पुणे एटीएस जालना रेल्वे पुणे, येथे कर्तव्य बजावले आहे. तर नवी मुंबई क्राईमचे डीसीपी असताना अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा यशस्वी तपास त्यांनी केला आहे. सातारच्या पोलीस अधीक्षक पदावरून सध्या त्यांनी 20 एप्रिल 2026 रोजी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे.




