फलटण:-ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये.
राष्ट्रीय अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये.
: फलटण तालुका ओबीसी आरक्षण संघर्ष समिती.
प्रक्षोभक वक्तव्य केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.
मलटण :
संपूर्ण राज्यभर मराठा समाजाच्या वतीने ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी केली जात आहे या मागणीला सर्व ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे सध्या ओबीसी कोट्यातून अनेक जाती जमातींना आरक्षण दिले जात असल्याने या प्रवर्गातून मराठा समाजास आरक्षण देऊ नये असे निवेदन फलटण तालुका ओबीसी आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने फलटण तहसिलदार अभिजीत जाधव यांना देण्यात आले.
मराठा समाज आरक्षण मागणी प्रसंगी आंदोलन मेळावा व जनजागृती वेळी वारंवार ओबीसी समाज ,ओबीसी नेते ,महापुरुष व कार्यकर्त्यांवर व्यक्तिगत व सामाजिक तेढ निर्माण करणारे भाष्य केले जाऊ नये असे ओबीसी आरक्षण संघर्ष समितीने आपल्या निवेदनात म्हणले आहे.
आज फलटण येथे होणाऱ्या मराठा आरक्षणा बाबत होणाऱ्या सभेत मनोज जरांगे पाटील मार्गदर्शन करणार आहेत त्यांच्या भाषणांचा मागील इतिहास पाहता त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या असून आता यापुढे अशी वक्तव्ये ओबीसी समाज सहन करणार नाही असे झाल्यास ओबीसी तीव्र आंदोलन करतील असेही निवेदनात म्हणले आहे.
यावेळी डॉ बी के यादव , काशिनाथ शेवते ,दशरथ फुले , बापूराव शिंदे ,बाळासाहेब ननावरे ,गोविंद भुजबळ , अमिरभाई शेख रणजित भुजबळ विकास शिंदे बाळासाहेब काशिद विजय शिंदे बापूराव काशिद अमोल रासकर माधव जमदाडे शरद कोल्हे विवेक शिंदे व्यंकटराव दडस नितीन सुळ दीपक शिंदे कृष्णाथ नेवसे डी वाय शिंदे अंबादास दळवी वैभव नाळे बंडू शिंदे राहुल शिंदे ,नाना नाळे, रणजीत नाळे, प्रशांत शिंदे, अमोल शिंदे, आप्पा पिसाळ, प्रवीण फरांदे, रमेश नाळे, नंदकुमार कचरे, रोहन शिंदे.