आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-नाऊर येथील ग्रामसभा खेळीमेळीत – आ.कानडे यांनी नाऊर चौकात बस थांबासाठी शेड देण्याची मागणी.

पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक:-9921435437

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक
नाऊर येथील ग्रामसभा खेळीमेळीत
आ.कानडे यांनी नाऊर चौकात बस थांबासाठी शेड देण्याची मागणी.
नाऊर ( वार्ताहर ) श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील ग्रामसभा अनेक विषयांवर चर्चा करत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये विशेषता: नाऊर रामपूर चौफुली येथे अनेक विद्यार्थी, अबालवृद्ध प्रवाशी ऊन पावसात थांबत असतात. त्यांच्यासाठी बसथांबा शेड करण्याची आग्रही मागणी ग्रामस्थातुन करण्यात आली.
या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी मावळते सरपंच सोन्याबापू शिंदे हे होते तर उपसरपंच मुसाभाई पटेल, विठ्ठल गहिरे ग्रामविकास अधिकारी पी.व्ही. ढुमणे, सहा.पशुधन विकास अधिकारी डॉ. भरत पावसे, आरोग्य उपकेंद्राचे डॉ.प्रतिक ब्राम्हणे, कृषी सहायक अनिलकुमार शेजुळ, कामगार तलाठी अविनाश तेलतुंबडे,जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती लोखंडे, अंगणवाडी सेविका सौ. लता शिंदे, सौ. वैशाली शिंदे,आशा सेविका सौ. पुनम वाघचौरे, श्रीमती सविता शिंदे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
या ग्रामसभेमध्ये हर घर जल योजने अंतर्गत सुरु असलेल्या १ कोटीच्या कामाचा आढावा घेण्यात आला,प्रधान मंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास अशा यादीचे वाचण करण्यात आले.प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉ. प्रतिक ब्राम्हणे यांनी टी. बी. मुक्त गाव, व बालविवाह बंदीसाठी ग्रामस्थांना शपथ देत औषधांचा तुटवडा भासु नये व उपचारासाठी विलंब होऊ नये आणि कर्मचारी कमतरता यामुळे रुग्णांची अडचण होत असल्याचे नमुद केले. ग्रामस्थांनी गावठाण परिसरात महिलासाठी सुलभ शौचालय बांधणे,गावात बंदीस्त गटारी,पथदिवे बसवणे, बंद पडलेले लाईट दुरुस्त करणे ‘रस्ता कांक्रीटीकरण करणे ‘ थकीत गाळाभाडे , घरपट्टी नळपट्टी ‘ वसुली करणे, जाफराबाद सारखे रस्ताच्या दुतर्फी झाडे लावणे, माझी वसुंधरा अंतर्गत स्वच्छता, प्लॅस्टिक बंदी, घनकचरा व्यवस्थापन करणे आदी विषयावर साधकबाधक चर्चा करण्यात आली.
तसेच मागासवर्गीयां साठी दफन भुमी ला जागा मिळावी व बसमध्ये विद्यार्थी धिंगाणा घालतात तसेच सार्वजनिक उत्सव सर्व समाजाने मिळून एकत्र करण्याची मागणी अशोक गायकवाड यांनी केली.
याप्रसंगी शिक्षक सुरेश देसाई, गोकुळ देसाई, दिलिप गायकवाड, सुदाम देसाई, अशोक गायकवाड, नवाज पटेल , विश्वास नानेकर, अरुण शिंदे, विजय गायकवाड, युनुस पटेल , कदिर पटेल, सुरज गायकवाड, कैलास देसाई, कैलास राशिनकर सुमित गायकवाड, गणेश देसाई, दिनकर शिंदे, दिपक गायकवाड, किशोर त्रिभुवन, किशोर देसाई, चंद्रकांत गहिरे, अमोल गहिरे पत्रकार संदिप जगताप आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मावळते सरपंच सोन्याबापू शिंदे यांनी गेल्या ५ वर्ष ग्रामस्थांनी भरपूर सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थांचे धन्यवाद व्यक्त केले.
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button