वाई:- किसन वीर महाविद्यालयामध्ये एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
वाई दि.07
किसन वीर महाविद्यालयामध्ये एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न.
येथील किसन वीर महाविद्यालयामध्ये अग्रणी महाविद्यालय योजनेच्या भव्य कार्यक्रमांतर्गत “संशोधनातील वर्तमानकालीन प्रवाह” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. इतिहास व इंग्रजी विभाग, संशोधन व विकास कक्ष , अंतर्गत दर्जा हमी कक्ष, शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद आणि अखिल भारतीय इंग्रजी शिक्षक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रंसगी शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ.अवनीश पाटील, छत्रपती राजाराम कॉलेज, कोल्हापूर येथील इंग्रजी विभागप्रमुख डॉ. रघुनाथ कडाकने हे साधनव्यक्ती म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यशाळेचे समन्वयक डॉ.भीमाशंकर बिराजदार यांनी उपस्थितांचे स्वागत करून; प्रस्तावनेत कार्यशाळा घेण्यामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यशाळेचे उद्घाटक प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे म्हणाले की, “अलीकडच्या काळातील संशोधन क्षेत्रामध्ये नवनव्या पद्धतीने संशोधन करण्याची संधी असल्याने संशोधकांनी या संधीचे सोने करावे. या प्रकारच्या कार्यशाळेमधून विद्यार्थ्यांमध्ये संशोधक दृष्टिकोन व जिज्ञासूवृत्ती जागृत होण्यास नक्कीच मदत होईल.”
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभागप्रमुख व ख्यातनाम इतिहास संशोधक डॉ.अवनीश पाटील यांनी इतिहास संशोधनाच्या सर्व प्रवाहांचा मागोवा घेतला. ते म्हणाले, “सध्या शोषितांचा, वंचितांचा इतिहासाभ्यास हा प्रमुख प्रवाह असून; इतिहासातील सामान्य माणसाच्या भावनात्मक, मानसिक विश्वाचा शोध घेणे याला महत्व प्राप्त झाले आहे.” या सत्राचे अध्यक्ष डी.आर.माने महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख डॉ. संतोष जेठीथोर हे होते.
दुसऱ्या सत्रात कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख डॉ. रघुनाथ कडाकने यांनी भाषाविज्ञान व वाङ्मय अभ्यासाच्या प्रवाहांची माहिती सांगून; डिजिटल ह्यूमॅनिटीज हे अभ्यासाचे नवे दालन उपलब्ध झाल्याचे सांगितले. या सत्राचे अध्यक्ष किसन वीर महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख डॉ.सुनील सावंत यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रेश्मा मुलांनी यांनी केले. डॉ.विनोद वीर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी,विद्यार्थिनी, संशोधक प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते.