क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुसेसावळी:-शनिवार पर्यंत १५ जणांना पोलिस कोठडी दंगलीप्रकरणी औंध पोलिसांनी बुधवारी सहा जणांना केली अटक.

पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर:-7499265724

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर

“शनिवार पर्यंत १५ जणांना पोलिस कोठडी
दंगलीप्रकरणी औंध पोलिसांनी बुधवारी सहा जणांना केली अटक.

याप्रकरणी दोन दिवसांत अटक केलेल्यांची संख्या 15 असून, त्यांना वडूज न्यायालयाने (ता. 16) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत. या प्रकरणी एकूण तीन गुन्हे दाखल असून, त्यात शासकीय कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्याचाही समावेश आहे. बुधवारी जोतीराम भाडुगळे, किशोर कदम, जयराम नागमल, किरण घार्गे, विजय निंबाळकर, सोमनाथ पवार, शिवाजी पवार, श्रीनाथ कदम, दादासाहेब माळी (सर्व रा. ज.स्वा. वडगाव) यांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली. याचबरोबरच महेश कदम, विकास घार्गे (रा. ज.स्वा. वडगाव), अनिरुद्ध देशमाने (रा. पुसेसावळी), नीलेश सावंत, सागर सावंत, प्रमोद कोळी (रा. गोरेगाव-वांगी) हे देखील अटकेत आहेत. या 15 जणांना बुधवारी वडूज येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्या सर्वांना (ता. 16 पर्यंत) पोलिस कोठडी सुनावली.”

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button