क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-पुसेसावळीकरांनी सावरले स्वतःला ,,,तीन दिवसानंतर परिस्थिती पूर्वपदावर.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

पुसेसावळीकरांनी सावरले स्वतःला ,,,तीन दिवसानंतर परिस्थिती पूर्वपदावर.

पुसेसावळी दि: एक वेळी सर्वधर्मसमभाव मानून हिंदू मुस्लिम समाजामध्ये एकोपा ठेवून आहे. या एकोपाला छेद देण्याची काम सोशल मीडियावरील वायरल ग्रुप वायरल पोस्टने केले होते .त्यामुळे जाळपोळीची घटना घडवून एका निरापराधीचा बळी गेला. आठ ते दहा जण जखमी झाले हा वनवा पेटू नये यासाठी मग जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने नेट सुविधा बंद केली. आणि त्यानंतर पुसेसावळी परिसरात तरुणांची धरपकड सुरू झालेली आहे .या घरपकडीमुळे आता पुसेसावळी परिसरात पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. लोकांनी निर्भयपणाने आपली दैनंदिन व्यवहार सुरू करावेत असे जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने तसेच ग्रामपंचायतने आवाहन केले होते . त्याला हळूहळू प्रतिसाद लाभत आहे.
खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील जाळपोळ प्रकरणी ४० हल्लेखोर निष्पन्न झाले आहेत .शंभरहून अधिक जणांना अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेली आहे .पुसेसावळी परिसरात फेरफटका मारला असता पॉलिसी यंत्रणेने पूर्ण पुसेसावळी परिसराचा ताबा घेतल्याचे दिसून आले. लोकांना दैनंदिन व्यवहार करण्याची तीव्र इच्छा आहे .पण ,पुन्हा अनुचित प्रकार घडू नये अशी बारीकशी भीती सुद्धा चेहऱ्यावर दिसून येत आहे .
सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व पोलीस अधीक्षक समीर शेख स्थानिक गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व त्यांच्या टीमने अत्यंत चांगल्या पद्धतीने सदरची परिस्थिती हाताळताना कॉर्डिनेशन ठेवले होते. त्यामुळे पुसेसावळी वगळता अन्यत्र फारसा परिणामकारक असा प्रकार घडलेला नाही. ही समाधानाची बाब आहे .सदर जाळपोळीनंतर ,३०२,३०७, १४७ तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे कायदा ३ नुसार औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या धरपकडीमुळे विविध संघटनेत कार्यरत काही तरुणांना सुद्धा आता जेलची हवा खावी लागलेली आहे. या तरुणांचे भव्यतव्य अंधकारमय झाले असून त्यांच्या सुटकेसाठी अद्याप कुणीही संघटनेचे तारण हार धावून आलेले नाहीत. बिचाऱ्या तरुणांच्या घरातील लोकांना आता धावपळ करावी लागत आहे. ही बाब सुद्धा नजरेआड करता येणार नाही.
एखादी घटना घडल्यानंतर काहीजण आपला हेतू साध्य करून पलायन करतात. पण बघायच्या गर्दीत बघण्याची हौस असणाऱ्यांना मात्र दोषी धरून त्यांच्यावर कारवाई केली जाते. वास्तविक पाहता ज्यावेळी सदरची घटना घडली. त्यावेळेला पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये ठाण्याचे प्रमुख म्हणून पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली नव्हती. तसेच खटाव तहसीलदार म्हणून ते पद रिक्त होते. तिसऱ्या बाजूला जर पाहिला तर आदरणीय कर्तबगार पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी जरी हॉट लाईन माध्यमातून संपर्क ठेवला असला तरी प्रत्यक्षात त्यांनी आतापर्यंत दुष्काळी दौरा केला नाही. किंबहुना ज्या ठिकाणी जाळपोळ झालेली आहे .त्याची पाहणी करून लोकांना दिलासा देण्यासाठी पुसेसावळीला अद्यापही धाव घेतली नाही. ही बाब आता स्थानिकांना खटकत आहे. काही वरिष्ठ नेत्यांनी तर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करताना आपलेच दात व आपलेच होत असल्याने आम्हाला सुद्धा काही करता येत नाही .ज्यावेळी महाराष्ट्रात दुर्घटना घडते त्यावेळेला संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री भेट देतात. त्याची संपूर्ण माहिती राज्याचे मुख्य म्हणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देतात पण सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सदर घटनास्थळी भेट दिली असती तर किती नियंत्रणाखाली आणण्यासाठी झटणारे पोलीस दल प्रशासन व स्थानिक ग्रामस्थ यांचे मनोधैर्य वाढले असते. हे सांगावे लागत आहे यातच सर्व काही आलेले आहे घटना पुसेसावळी या ठिकाणी घडली आणि प्रतिक्रिया साताऱ्यात मधून दिली जात आहे हे सुद्धा काही ना खटकत आहे. त्याला काही कारणे असू शकतात परंतु नेट बंद असल्यामुळे ते जनतेपर्यंत पोहोचले नाही हे सुद्धा विसरून चालणार नाही. वास्तविक पाहता नेट सुविधा बंद असल्यामुळे जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस यंत्रणा सांगते. तेच लोक खरे मानत असले तरी स्थानिक पातळीवर फेरफटका मारताना लोकांना शांतता हवी आहे. अनेक बाबीं बाबत चर्चा होताना दिसत आहे. जाळपोळ कुणालाही नको आहे. पुसेसावळीकरांना शांतता हवी आहे. परंतु, ही शांतता भंग करणाऱ्या दोन्ही गटातील काही लोकांना थोडी सवलत दिल्यामुळेच हा निंदनीय प्रकार झालेला आहे.
काहींनी सागितले की,इंटरनेट सेवा बंद करून पोलीस यंत्रणेने संपूर्ण सातारा जिल्ह्याला वेठीस धरले आहे. त्याबाबत कुठल्याही राजकीय नेत्यांनी अधिकृतरित्या आवाज उठवलेला नाही. पुसेसावळी येथील झालेल्या जाळपोळीनंतर अनेक व्यवहार ठप्प झालेले आहेत राष्ट्रीयकृत व खाजगी बँकेतून कर्जाचे हप्ते भरताना विलंब झाल्यामुळे दंड आकारणी केली जात आहे. तसेच अनेकांचे आर्थिक व्यवहार थांबलेले आहे. यातून व्याजाची रक्कम वाढली असली तरी त्याचा फटका सर्वसामान्यांना बसलेला आहे. गोरगरीब शेतमजूर, कष्टकरी व हातावर पोट असणारे लोक दर महिन्याला २८ दिवसाचे नेटचे शुल्क भरतात. त्यांना दोन दिवस वाढवून मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. याबाबतही जिल्हा प्रशासनाने तत्परतेने कारवाई करणे गरजेचे आहे .एकूणच पुसेसावळी परिसरामध्ये मूठभर लोकांच्या टवाळकीने जाळपोळीची घटना घडलेली आहे. त्यातून लोकांना चांगला धडा मिळालेला आहे .त्यामुळे पुसेसावळीकरांनी आता संयम राखूनच झाले गेले गंगेला मिळाले असे समजून सर्व धर्म समभाव जागृत ठेवावा. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे . पुसेसावळी ग्रामपंचायत बुधवारी आपले व्यवहार पुन्हा पूर्ववत सुरळीत करावेत असे कळकळीच्या आवाहन केले होते तरीसुद्धा बुधवारी लोकांनी दुकाने उघडण्याचे धाडस केलेले आहे या लोकांशी प्रशासन पोलीस यंत्रणेने संवाद साधून त्यांचे म्हणणे सुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे त्या दृष्टीने पाऊल उचलावे लागेल असे सूचित करावे वाटत आहे. दरम्यान शनिवारी सातारा शहरातून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे हा मूक मोर्चा शांततेत काढण्याची जबाबदारी आता मोर्चा काढणाऱ्यांचीच आहे यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी आता त्यांनीच घ्यावी कारण प्रत्येक वेळेला जिल्हा परिषद प्रशासन व पोलीस यंत्रणेने चांगल्या गोष्टी कराव्यात हे जरी खरे असेल तरी वाईट गोष्टी घडू नये याची जबाबदारी आता संबंधितांनी नैतिकता म्हणून घेतलीच पाहिजे असाही सुरू उमटत आहे.
—————————————————

डॉ
कॅप्शन- पुसेसावळी ता खटाव या ठिकाणी पुकारण्यात आलेल्या बंदचे छायाचित्र (छाया- अजित जगताप ,सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button